भाजपमध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार की धुतल्या तांदळासारखे?

देवेंद्र फडणवीस संन्यास घेण्याची भाषा करतात हे त्यांच्या पक्षाचे वैफल्य आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
MP Sanjay Raut criticize BJP leaders over ED enquiry of Anil Deshmukh
MP Sanjay Raut criticize BJP leaders over ED enquiry of Anil Deshmukh

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवतीचा फास ईडीने (ED) आवळला आहे. तसेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हेही ईडीच्या रडारवर आहेत. त्यावरून भाजपकडून सातत्यानं सरकारला धारेवर धरलं जात आहे. तर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून यामागे भाजपच असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आज भाजपवर सडकून टीका केली आहे. (MP Sanjay Raut criticize BJP leaders over ED enquiry of Anil Deshmukh)

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, राज्यात विरोधी पक्षाला हवं असलेले घडत नाही. देवेंद्र फडणवीस संन्यास घेण्याची भाषा करतात हे त्यांच्या पक्षाचे वैफल्य आहे. ही विरोधी पक्षाची भूमिका दिसत नाही. अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. ईडी चौकशीतून त्यांची कोंडी केली जात आहे. भाजपमध्येही सगळे धुतल्या तांदळाचे आहेत का? हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? भाजपमधील कुणावरच असे आरोप झाले नाहीत का?, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले. देशमुख व सरनाईक यांच्याबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून पुढील दिशा ठरवतील, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

तीन पक्षांमध्ये नाराजी नाही

महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होतील. तीन पक्षांचे सरकार व्यवस्थित सुरू असून पाच वर्षे टिकेल. सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. कुणीही नाराज नाही. शरद पवार नाराज असल्याच्या चर्चेलाही अर्थ नाही. या चर्चेला आता पूर्णविराम द्यावा लागले. शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये कुणालाही भेटल्याचा इन्कार केला आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या चर्चा झाली असली तरी त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, दोन्ही बैठकांमागे कसलंही राजकारण नाही, असं राऊत यांनी सांगितलं. 

परीक्षा सेट झालीय

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधीही झाली तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकेल. आम्हाला जेव्हा परीक्षा द्यायची आहे तेव्हा देऊ. परिक्षा सेट झाली आहे. यात कुणाचे काय फुटेल ते पहा, अशा इशारा राऊत यांनी दिला. कोरोनाचे पालन करत एकटाच फिरत आहे. भाजपलाच कोरोना झालाय, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 

देशमुख यांची ईडीला हुलकावणी

अनिल देशमुख यांना ईडीने आज चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस पाठवली होती. पण देशमुख यांनी वय आणि आजारपणाचं कारण देत ऑनलाईन चौकशी करण्याची विनंती ईडीला आज केली. आपलं वय 72 असून इतर आजारही आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपली ऑनलाईन चौकशी करावी, असं पत्र देशमुख यांच्यावतीनं ईडीला देण्यात आलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com