नेत्याच्या पक्षप्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप खासदार म्हणाल्या, त्यांना काढून टाका!

आपल्या पक्षाच्या खासदारांचे घर जाळल्याचा आरोप असलेल्या माजी आमदाराला भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे.
MP Rita Bahuguna Joshi demands end Jitendra Singhs Membership
MP Rita Bahuguna Joshi demands end Jitendra Singhs Membership

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर एका माजी आमदाराच्या प्रवेशाने वाद निर्माण झाला आहे. आपल्या पक्षाच्या खासदारांचे घर जाळल्याचा आरोप असलेल्या माजी आमदाराला भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. त्यानंतर या महिला खासदाराने संबंधित नेत्याला पक्षातून काढण्याची मागणी केली आहे.  पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही मागणी झाल्याने पक्षनेतृत्वासमोर अडचण निर्माण झाली आहे. (MP Rita Bahuguna Joshi demands end Jitendra Singhs Membership)

बहुजन समाज पक्षाचे नेते जितेंद्र सिंह बबलू यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर भाजपच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी यांचं घर जाळण्याचा आरोप आहे. ही घटना जोशी या काँग्रेसमध्ये असतानाची आहे. जितेंद्र सिंह बबलू हे मुळचे अयोध्याचे आहेत. ते बसपाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर जोशी यांचं घर जाळल्याचा आरोप आहे. 

या पक्षप्रवेशाबाबत समल्यानंतर जोशी यांनी नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, या प्रवेशानंतर मी स्तब्ध झाले. मी मोरादाबादमध्ये जेलमध्ये असताना जुलै 2009 मध्ये या व्यक्तीने माझं घर जाळलं आहे. चौकशीमध्ये ते सिध्द झालं आहे. मला खात्री आहे या नेत्यानं पक्षापासून ही माहिती लपवून ठेवली असले. प्रदेशाध्यक्षांनाही याबाबत माहिती नसेल. मी राज्य व राष्ट्रीय प्रदेशाध्यक्षांना संबंधित नेत्याचे सदस्यत्व रद्द करण्याची विनंती करत आहे. त्याच्याविरूध्द गंभीर आरोप असून माझं घरही पेटवलं होतं, असं जोशी यांनी सांगितलं. 

दरम्यान, ही घटना 2009 मध्ये घडली होती, त्यावेळी जोशी काँग्रेसमध्ये होत्या. या प्रकरणात हुसेनगंज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 2011 मध्ये तपासात बबलू यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना अटकही झाली होती. बबलू यांची जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर 2017 मध्ये पोलिसांनी जीवे मारण्याच्या प्रयत्नाअंतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हाही जितेंद्र सिंह यांना पोलिस अटक करणार होते. पण उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं. बबलू हे बाहूबली नेते असल्याने भाजपने त्यांना पक्षात स्थान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अशा नेत्यांकडे आपला मोर्चा वळवल्याचे सुत्रांनी सांगितले.

भाजपपकडून मंगळवारी पक्षात येणाऱ्या नेत्यांची यादीच जाहीर केली. त्यामध्ये आजमगढचे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार पंकज मोहन सोनकर यांच्यासह श्याम शंकर तिवारी, गाजियाबाद येथील मनोज शर्मा, रायबरेलीतील प्रवेश सिंह हेही मायावती यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहे. आग्रा येथील डॉ. बीना लवानिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण बबलू यांच्या प्रवेशानं वाद निर्माण झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com