रात्री उशिरा फोन आला अन् सकाळीच नाना पटोले थेट दिल्लीला!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेधुळे दौरा रद्द करुनतातडीने दिल्लीलारवाना झाले आहेत.
maharashtra congress president nana patole in delhi now
maharashtra congress president nana patole in delhi now

जळगाव : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे धुळे दौरा रद्द तातडीने दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहेत. काल (ता.23) रात्री उशिरा त्यांना दिल्लीवरुन फोन आल्याने ते दिल्लीला रवाना झाले आहेत. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shivsena) हे घटक पक्ष स्वबळाचा नारा देऊ लागल्याने पटोलेंचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. 

नाना पटोले हे कालपासून (ता.२३) जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. काल त्यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा आटोपला. आज ते धुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. त्यांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, आज सकाळी अकरा वाजता ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. पटोले हे जळगाव येथून वाहनाने धुळे आणि तेथून शिरपूरमार्गे इंदोरला गेले. इंदोरमधून विमानाने ते दिल्लीला रवाना झाले. याबाबत जळगाव जिल्हा काँगेसचे अध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी सांगितले की, जळगाव मुक्कामी असताना नाना पटोले यांना रात्री उशिरा दिल्लीहून फोन आला.  आज ते धुळ्यातील कार्यक्रम पुढे ढकलून दिल्लीला रवाना झाले.

मागील काही दिवसांपासून नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ महाविकास आघाडीतल नेतेही स्वबळाची भाषा करु लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव दौऱ्यात बोलताना ते म्हणाले होते की, स्वबळ काय नवीन आहे का? गेल्या युती सरकार मध्ये शिवसेना, भाजपही भांडत होते ना. मग आता मी बोललो त्यांत काय? प्रतेक पक्षाचा तो अधिकार आहे.

स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचे मी बोललो आणि माध्यमांनी तेच लावून धरले आहे. आता सत्तेत असलेल्या पक्षांनी स्वबळावर लढण्याचे घोषित करणे महाराष्ट्राला नवीन आहे का? या पूर्वी गेल्या पाच वर्षांत राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार होते,ते तर अगदी नळावरचे भांडण असल्याप्रमाणे भांडत होते, आणि प्रतेक पक्षाचा तो अधिकार आहे.त्या मुळे आपण बोललो. त्यात कोणतेही नावीन्य नाही अजून निवडणुकीला तीन वर्षे बाकी आहेत, असे पटोले यांनी म्हटले होते. 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एकमेव समान कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे खरेतर काँग्रेसला संजीवनी मिळाली. नाना पटोलेंच्या रूपात प्रदेश काँग्रेसला आक्रमक अध्यक्ष लाभला. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने त्यांचे कामही सुरू झाले. विदर्भातून त्यांनी दौरा सुरू करताना स्वबळाचा नारा दिला होता. ते जळगावच्या दौऱ्यावरुन धुळ्याला जाणार होते. 

पटोलेंच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुखांनी ‘स्वबळाची भाषा वापरली, तर लोक जोड्याने मारतील,’ असा इशारा देत समाचार घेतला होता. पक्षाचे प्रवक्ते व महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांनी जळगावात दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला मात्र मुख्यमंत्री विसरले, हा भाग निराळा. पण, पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याने राज्यभर राजकीय चर्चा मात्र नक्कीच रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com