bjp leader chandrakant patil says ajit pawar and anil parab cbi investigation proposal
bjp leader chandrakant patil says ajit pawar and anil parab cbi investigation proposal

अजितदादा अन् अनिल परबांच्या सीबीआय चौकशीचा प्रस्ताव मंजूर; चंद्रकांतदादांची माहिती

पुढील काळात अजित पवार आणि अनिल परब यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करावी, असा प्रस्ताव भाजप (BJP) कार्यकारिणीच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबद्दल माहिती दिली. यामुळे पुढील काळात अजित पवार आणि अनिल परब यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपण दोन वर्षे कार्यकारिणीची बैठक घेऊ शकलो नाही. सगळ्यांनी एकाच ठिकाणी येण्यापेक्षा प्रत्येक जिल्हा कार्यालयातून कार्यकर्त्यांना या बैठकीत सहभागी करून घेतले आहे. कोरोना संकटाच्या काळात आपण सर्वसामान्यांची सेवा केली.  इतर लोक जे मदतीसाठी येत होते त्यांनाही पुढे आणले.

महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना आपण घालवले आहे, असे सांगून पाटील म्हणाले की, आम्ही दोन मंत्र्यांना घालवले. कदाचित त्यांना अधिवेशनाची पण भीती वाटली असावी म्हणून ते आता केवळ 2 दिवसांचे केले आहे. आधी एकाच दिवसात 9 वेळा अधिवेशन स्थगित झाले होते. 

महाराष्ट्राचा नेता कसा असावा, यापेक्षा महाराष्ट्र कसा असायला हवा, हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनमताने महाराष्ट्राच नेतृत्व कुणी केल पाहिजे हे आधीच स्पष्ट केले होते. अहंकारापेक्षा वैराग्यपूजन ही आमची भूमिका आहे. एका पक्षाला दुसऱ्याशिवाय पर्याय नव्हता, दुसऱ्या पक्षाच संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेले आणि तिसऱ्याने आमचा विश्वासघात केला अस हे सरकार आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 

आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीवर हल्ला 
आशिष शेलार म्हणाले की, राजावाडी हॅास्पिटलमधील एका तरूणाचे डोळे उंदराने कुरडतले.  आज त्या तरुणाचा मृत्यूही झाला. सरकारने कोरोनाचे 11 हजार 500 मृत्यू लपवले. हे महाराष्ट्र मॅाडेल आहे का? तो लशीसाठी काढलेला एक रकमी चेक कुठ गेला? पावसात भिजला का? त्या रकमेच पुढे काही झाले नसेल तर ते पैसे पॅकेज म्हणून लगेच द्या. 

मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात स्पष्टपणे सांगितले की मला पुर्ण पणे बाजु मांडण्यास मदत केली नाही. याला जबाबदार कोण आहे? मराठा आरक्षणात झालेली चूक होती की हा ठरवून केलेला कट होता याचे आता उत्तर सरकारने आता द्यायला हवे. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार आहे, असाही टोला शेलार यांनी लगावला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com