Rajaram Sugar Factory : संपूर्ण ताकद लाऊनही महाडिकांनी सतेज पाटलांना चिटपट केलेच; 'हे' फॅक्टर ठरले महत्त्वाचे

Rajaram Sugar Factory Election Result Kolhapur : यामध्ये निवडणुकीमध्ये महाडिक गटाने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला
Mahadevrao Mahadik, Satej Patil News
Mahadevrao Mahadik, Satej Patil NewsSarkarnama

Rajaram Sugar Factory Election Result : कोल्हापुरातील (Kolhapur) अटितटीच्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना ( Chhtrapati Rajaram Sugar Factory Election Result) निवडणुकीची मतमोजणी कोल्हापूरमधील रमणमळा शासकीय गोदामात पार पडली. यामध्ये निवडणुकीमध्ये महाडिक गटाने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवत पाटील गटाचा २१-० ने पराभव केला.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत महाडिक गटाने पुन्हा एकदा बाजी मारत सत्ता अबाधित राखली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना पुन्हा एकदा राजाराम कारखान्याने हुलकावणी दिली आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, तरीही महाडिकांनी त्यांना चितपट केलेच.

Mahadevrao Mahadik, Satej Patil News
Kolhapur News : महादेवराव महाडिकांसह तीन जणांचा विजय; इतरांची मोठी आघाडी : सतेज पाटलांना धक्का...

निवडणुकीमध्ये कंडका पाडायचाच या स्लोगनने प्रचारामध्ये उतरलेल्या सतेज पाटलांचा (Satej Patil) महाडिक आघाडीने धुव्वा उडवला. सर्वच्या सर्व जागांवर महाडिक विजयी झाले. ज्या ताकदीने विरोधी आघाडीकडून प्रचार करण्यात आला होता, त्यामुळे महाडिकांच्या सत्तेला सुरूंग लागतो की काय? अशी शंका कोल्हापूरत वर्तविण्यात येत होती. मात्र, पुन्हा एकदा सभासदांनी सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवला.

मात्र, या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध सगळे असा सामना रंगला. पाटील या निवडणुकीत एकटे लढले. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी महाडिक यांना पाठिंबा दिली होता. संपूर्ण महाडिक कुटुंब निवडणुकीत उतरले होते. तसचे निवडणुकी आघीच सतेज पाटील गटाचे तब्बल २९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते.

Mahadevrao Mahadik, Satej Patil News
Rajaram Sugar Factory : राजाराम कारखान्यावर पुन्हा महाडिकांची एकहाती सत्ता; सतेज पाटलांना धोबीपछाड

आमदार विनायक कोरे, माने गट आवाडे गट यांचेही बळ सत्ताधारी महाडिक गटाला मिळाले. महादेवराव महाडिक यांनी त्यांचे आभार मानले. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. यामुळे अनेक वर्ष सत्ता असलेल्या कारखान्यावर महाडिक यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सलग निवडणूक जिंकलेल्या पाटील यांना दारुण पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर महाडिक आघाडी सुरुवातीपासून घेतलेली घेतली होती. पहिल्या फेरीमध्ये जवळपास 800 ते 1000 मतांनी सर्वच उमेदवार आघाडीवर होते. तिच परिस्थिती दुसऱ्या फेरीत आणि नंतरच्या फेऱ्यांमध्ये दिसून आली.

या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे या निवडणुकीने टोक गाठले होते. या निवडणुकीमध्ये काय होते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, आता या निवडणुकीमध्ये महाडिक गटाने एकहाती सत्ता मिळवली आहे. विजय निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक तसेच खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांनी पत्रकार परिषद घेत सतेज पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com