जावेद अख्तर-शबाना आजमी भेटीवरून कंगना बिथरली! ममतांना म्हणाली...ताडका!  - Kangana Ranawat Called Mamata Banarjee as Tadaka Asur-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

जावेद अख्तर-शबाना आजमी भेटीवरून कंगना बिथरली! ममतांना म्हणाली...ताडका! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 जुलै 2021

मीही सर्व देशद्रोह्यांना नागडे करीन, हे विसरू नका...जरा सांभाळू,' अशी पोस्ट कंगनाने केली आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियातून सतत वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री शुक्रवारी पुन्हा बरळली आहे. आता तिने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आजमी यांच्यावर निशाणा साधला आहे. या तिघांच्या दिल्यात झालेल्या भेटीवरून तिने  पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ममतांचा उल्लेख तिने 'ताडका' केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Kangana Ranawat Called Mamata Banarjee as Tadaka Asur)

ट्विटरवरून सतत वादग्रस्त बोलणाऱ्या कंगनाचे खाते बंद करण्यात आले आहे. पण त्यानंतरही कंगनाकडून फेसबुकच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मागील दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नितीन गडकरी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या दौऱ्यात त्यांनी जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांचीही भेट घेतली. कंगनाने नेमक्या याच भेटीवरून निशाणा साधला.

हेही वाचा : राहुल गांधींनी गाजावाजा न करता घेतली लस! संसदेत दोन दिवस दांडी

कंगनाने फेसबूक पोस्ट लिहित ममता बॅनर्जी यांचा उल्लेख 'ताडका' असा केला आहे. ताडका ही रामायणातील एक असुर आहे. 'काल शबाना आजमी आणि जावेद अख्तरजी यांनी बंगाल के मुख्यमंत्री ज्यांना ताडकाच्या नावाने ओळखले जाते, त्यांच्यासोबत एक बैठक घेतली. या भेटीनंतर आता ते हळू हळू बॉलीदाऊद माफिया गल्ल्यांमध्ये छोट्या छोट्या बैठका घेतील. ते खानांवर दबाव टाकतील आणि खान सर्व मोठ्या निर्मात्यांमार्फत सर्व छोट्यांपासून मोठ्या कलाकारांना आपल्या हाताशी धरतील,' असं म्हणत कंगनाने बॉलीवूडलाही लक्ष्य केलं आहे. 

'सर्व मिळून ताडकाला देवी बनवतील. दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस दाखवण्याचा कार्यक्रम आता सुरू झाला आहे. पण मीही सर्व देशद्रोह्यांना नागडे करीन, हे विसरू नका...जरा सांभाळू,' अशी पोस्ट कंगनाने केली आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्याला एक लाखांहून अधिक लाईक्स असून 11 हजार कमेंट आहेत. तसेच 5 हजारांहून अधिक जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख