भारतातील दुसरी लाट ओसरतेय? सलग पाचव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली - india records less than 3 lakhs covid cases for five consecutive days | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

भारतातील दुसरी लाट ओसरतेय? सलग पाचव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्या आज सलग पाचव्या दिवशी तीन लाखांच्या खाली राहिली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्या (Patients) आज सलग पाचव्या दिवशी तीन लाखांच्या खाली राहिली आहे. असे असले तरी जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू  (Covid Deaths) भारतात होत आहेत. देशात मागील 24 तासांत 2 लाख 59 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या रुग्णांची संख्या साडेतीन लाख आहे.  

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 91 हजार 331 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच वेगाने रुग्णसंख्येत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचे सूर सरकारमधून व्यक्त होत आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : सावधान...ब्लॅक फंगसपेक्षाही धोकादायक व्हाईट फंगस भारतात सापडला 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 30 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 30 लाख 27 हजार 925 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 11.63 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.25 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 27 लाख 12 हजार 735 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख