सावधान : ब्लॅक फंगसपेक्षाही धोकादायक व्हाईट फंगस भारतात सापडला

कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढली असतानाआता व्हाईट फंगस देशात सापडला आहे.
after black fungus more dangerous white fungus found in bihar
after black fungus more dangerous white fungus found in bihar

नवी दिल्ली : कोरोनातून (Covid 19) बरे झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसिस (Black Fungus) हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता दक्ष झाले आहे. हरियाना, राजस्थान, तेलंगण या राज्यांनी या आजाराला महामारी (pandemic) म्हणून घोषित केले आहे. आज केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना या आजाराची नोंद साथरोग कायद्यात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता देशात यापेक्षा धोकादायक व्हाईट फंगस (white fungus) सापडला आहे. 

महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे या आजाराचा समावेश आता इतर साथींच्या आजारामध्ये होणार आहे. त्यानुसार साथरोग कायद्यानुसार उपाययोजना राज्यांना कराव्या लागणार आहेत. 

यातच आता व्हाईट फंगसचा पहिला रुग्ण बिहारमध्ये सापडला आहे. हा आजार म्युकरमायकोसिसपेक्षा धोकादायक असल्याचे तज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बिहारमध्ये व्हाईट फंगसचे 4 रुग्ण सापडले आहेत. यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. हा व्हाईट फंगस इतर राज्यांत पसरू लागल्याचे अद्याप समोर आलेले नाही. संसर्गजन्य विषाणूप्रमाणे ते आणखी धोकादायक ठरू शकतो, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. 

व्हाईट फंगस हा शरीरातील महत्वाच्या अवयवांपर्यंत सहजपणे पोचू शकतो. यात फुफ्फुसे, मूत्रपिंडे, आतडे, पोट यांचा समावेश आहे. याचा संसर्ग नखांमधूनही होऊ शकतो. म्युकरमायकोसिसप्रमाणे व्हाईट फंगसही जीवघेणा आहे. गर्भवती आणि लहान मुलांसाठी तो आणखी धोकादायक आहे. कोरोनाप्रमाणेच याची लक्षणे आहेत, अशी माहिती तज्ञांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com