workers in cremation ground demand hefty amount to perform last rites
workers in cremation ground demand hefty amount to perform last rites

कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करायचेत...तर मग नातेवाईकांनी 70 हजार तयार ठेवावेत

देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. जगात सर्वाधिक कोरोना मृत्यू भारतात होत आहेत. यात काही जणांनी अंत्यसंस्काराचा बाजार सुरू केला आहे.

हैदराबाद : देशातील कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. जगात सर्वाधिक कोरोना मृत्यू (Covid Deaths) भारतात (India) होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी (Funeral) स्मशाने अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत काही जणांनी याचा धंदा सुरू केला असून, ते अडलेल्या नातेवाईकांकडून 70 हजार रुपयांपर्यंत पैसे उकळू लागले आहेत. 

हैदराबादमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहेत. स्मशानभूमीतील कामगारांकडून पैसे घेतल्याशिवाय अंत्यसंस्कारासाठी अडवणूक केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. नातेवाईकांकडून अंत्यसंस्कारासाठी तब्बल 25 ते  70 हजार रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात आहे. 

सरकारी नियमानुसार, सरकारी रुग्णालयात मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णावर मोफत अंत्यसंस्कार करावे लागतात. याचवेळी खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कारासाठी 8 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेता येत नाही. प्रत्यक्षात मात्र, मोठ्या प्रमाणात पैसे अंत्यसंस्कारासाठी घेतले जात आहेत. ही रक्कम नातेवाईकांना रोख स्वरुपातच द्यावी लागते आणि त्याची कोणती पावतीही दिली जात नाही. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णाची पत्नी म्हणाली की, आम्हाला अंत्यसंस्कारासाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च सांगितला. पैसे मागणाऱ्याने मृतदेहावर कुठे अंत्यसंस्कार करण्यात येतील, हेसुद्धा सांगितले नाही. परंतु, पैसे दिल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कारच होणार नाहीत, असे बजावले होते. 

कोरोनामुळे पिता गमावलेला मुलगा म्हणाला की, माझ्या वडिलांचे निधन सरकारी रुग्णालयात झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी 70 हजार रुपयांची मागणी माझ्याकडे करण्यात आली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. सरकारी रुग्णालयात मृत्यू होऊनही अंत्यसंस्कारासाठी पैशांची मागणी करण्यात आली. 

याविषयी बोलताना विभागीय आयुक्त आर.उपेंदर म्हणाले की, मागील महिन्यांपर्यंत कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना 25 हजार रुपये द्यावे लागत होते. मात्र, आम्ही नुकतीच स्मशानभूमीतील कामगारांची एक बैठक घेतली. खासगी रुग्णालयात मृत्यू झाला असेल तर 8 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेऊ नये, अशा सूचना आम्ही केल्या आहेत. सरकारी रुग्णालयात मृत्यू झालेले आणि बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गरीब कुटुंबातील मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करण्यासही सांगण्यात आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com