रूबाब दाखवण्यासाठी नवऱ्याला आयपीएसची वर्दी चढवणं डीवायएसपीला पडलं महागात!

रुबाब दाखवण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रकार करीत असतात. मात्र, एका महिला पोलीस उपअधीक्षकाने पतीलाच आयपीएसची वर्दी घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
dysp reshu krishna poses with husband with ips uniform
dysp reshu krishna poses with husband with ips uniform

पाटणा : रुबाब दाखवण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रकार करीत असतात. मात्र, एका महिला पोलीस उपअधीक्षकाने (DySP) पतीलाच आयपीएसची (IPS) वर्दी (Uniform) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, हा प्रकार महिला डीवायएसपीला अखेर महागात पडला असून, हा प्रकार थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत (PMO) पोचला आहे. 

भागलपूरमधील कहलगाव येथे रेशू कृष्णा या पोलीस उपअधीक्षक आहेत. त्यांनी पतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात त्या वर्दीवर असून, त्यांच्यासोबत त्यांचे पतीही आयपीएसच्या वर्दीत दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि या वर्दीतील जोडप्याचे खूप कौतुक झाले. दरम्यान, काही सोशल मीडिया यूजरनी कृष्णा यांचे पती आयपीएस नसल्याचे शोधून काढले. त्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला. 

या प्रकाराची तक्रार काही जणांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली. कृष्णा या स्वत:ही आयपीएस नसून राज्यसेवा परीक्षेतून आलेल्या आहेत. त्यांचे पती तर काहीच काम करीत नसल्याचे समोर येत आहे. त्यांनी आपले आयपीएस होण्याचे स्वप्न पतीला आयपीएसची वर्दी घालून पूर्ण केल्याची चर्चा सुरू आहे. या सोशल मीडिया पोस्टवरुन गदारोळ झाल्यानंतर कृष्णा या सोशल मीडियावरुन गायब झाल्या आहेत.  

बिहारमध्ये बीपीएससीमध्ये कृष्णा या महिलांमध्ये टॉपर होत्या. पाटण्यातील कंकडबाग येथे त्या राहत होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी सुनीलकुमार हे आयपीएस राहत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आयपीएस बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली होती. परंतु, त्यांना यश मिळाले नव्हते. अखेर बीपीएससी परीक्षेत त्यांना यश मिळाले. त्या आता पोलीस अधीक्षक म्हणून सेवेत रुजू आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी या प्रकाराची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली. कृष्णा यांनी त्यांचे पती हे आयपीएस असून, पंतप्रधान कार्यालयात नियुक्तीस असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने बिहारच्या पोलीस मुख्यालयाकडे विचारणा केली. त्यानंतर कृष्णा यांची चौकशी सुरू झाली. या घटनेने बिहार पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com