कोल्हे, आढळराव हे कावीळ झालेले लोक! फडणवीसांचा टोला

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गनिमी काव्याने बैलगाडा शर्यती घेतल्या. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
devendra fadnavis targets amol kolhe and shivaji adhalrao patil
devendra fadnavis targets amol kolhe and shivaji adhalrao patil

नागपूर : भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी गनिमी काव्याने बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) घेतल्या. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदीसाठी केंद्र सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हे आणि आढळराव यांना टोला लगावला आहे. 

बोलताना फडणवीस म्हणाले की, केंद्राच्या नावाने कावीळ झालेले हे लोक आहेत. याचा केंद्राशी काहीही संबंध नाही. न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला त्यावेळी आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये होते. त्यावेळी आम्ही एक कायदा केला आणि सर्वोच्च न्यायालयात एक अहवालही सादर केला. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे केंद्राचा याच्याशी काही संबंध नाही. 

बैलाला पाळीव प्राण्याच्या यादीतून काढण्याचा निर्णय मोदींच्या काळात झालेल नाही. काँग्रेसच्या काळात हा निर्णय झाला होता. बंदी ही प्राणी क्रूरतेच्या संदर्भात बंदी आहे. ही सगळी मंडळी आहेत त्यांना केंद्राकडे बोटे दाखवायची आहेत. स्वत: काही करायचे नाही. लोकांना मूर्ख बनवायचे असून, नाटक करायची आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.  

दरम्यान, पडळकर यांनी बैलगाडी शर्यत घेतल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचे समर्थन केले आहे. आढळराव पाटील म्हणाले की, बैलगाडा शर्यती बंदी असल्यापासून जनआंदोलन करण्यात आले ही सकारात्मक बाब मी मानतो. अनेक दिवसापासून बैलगाडा शर्यती बंद आहे. त्यामुळे आपल्यासाठी कोणीतरी लढतो आहे. हे बैलगाडा मालकासाठी चांगली गोष्ट आहे. यात राजकारण बाजूला ठेवून हा विषय सरकारने मार्गी लावावा. 

बैलगाडा शर्यती या पार पाडून दाखल्यानंतर यापुढचे आंदोलन आता थेट विधानसभेवर असल्याचं पडळकर यांनी जाहीर केलं आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्मगावापासून लवकरच बैलगाड्यांचा भव्य मोर्चा विधानसभेवर काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पोलीस बंदोबस्त आणि संचारबंदी लागू केलेली असतानाही पोलीस प्रशासनाला चकवा देऊन पडळकर यांनी वाक्षेवाडीच्या पठारावर बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पाडले. शर्यतीसाठी राज्यातून विविध भागांतून हजारोंच्या संख्येने तरुण शेतकरी आले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी तरुणांना पोलिस प्रशासनाशी कोणताही वाद न करता आणि शर्यतीला गालबोट न लावता शांततेत घरी जाण्याचे आव्हान केले. तसेच बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर आंदोलन उभा करून त्याला साथ देण्याचे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com