फडणविसांनी शिवसेनेची तुलना केली तालिबानशी

नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर गेल्यानंतर शिवसैनिकांनी शुद्धिकरण केलं होतं.
bjp leader devendra fadnavis compares shivsena to taliban
bjp leader devendra fadnavis compares shivsena to taliban

नागपूर : भाजप (BJP) नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) जन आशीर्वाद यात्रेदरम्यान (Jan Ashirvad Yatra) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळावर गेल्यानंतर शिवसैनिकांनी शुद्धिकरण केलं होतं. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. त्यांनी शिवसेनेची तुलना तालिबानशी केली आहे. 

फडणवीस म्हणाले की, माझ मतं असं आहे की ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. खर म्हणजे ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. काल आम्ही हा सवालही विचारा शिवसैनिकांची कृती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

काल आम्ही सवाल विचारला की, ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून बाळासाहेबांच्या समाधीवर जर कुणी जात असेल तर ती समाधी अपवित्र झाली अस सांगता हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं की ही कृती अतिशय अयोग्य आहे, असं फडणवीस म्हणाले.

नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण केलं होतं. यावरुन  राणेंनीही शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाची अवस्था आधी पाहा. स्मृतिस्थळ दलदलीत असून त्याकडे आधी पाहा मग शुद्धिकरण करा. गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी स्वत:च्या मनाचे शुद्धिकरण करा.

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईत गुरुवार (१९ ऑगस्ट) पासून सुरु झाली आहे. या यात्रेवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. कोरोनाची तिसरा लाट येण्याचा धोका असताना ही यात्रा काढण्यात आल्याचा ठपका ठेवला जात आहे. हेच कारण देत मुंबई पोलिसांनी या यात्रेवर एक-दोन नव्हे तर तब्बल 19 गुन्हे दाखल केले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांना देशभरात जनआशीर्वाद यात्रा आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राणेंची यात्रा गुरूवारपासून मुंबईतून सुरू झाली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट सुरू आहे. ही लाट काहीशी आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com