...तर रामदास आठवले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते! - Devendra Fadnavis says Ramdas Athavale would have become the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

...तर रामदास आठवले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जुलै 2021

मी त्यांना सांगत होतो की शिवसेनेसोबत अडीच वर्ष मान्य करा, अंस वक्तव्य आठवले यांनी केलं होतं.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnis) यांनी माझे ऐकले असते तर बरे झाले असते. मी त्यांना सांगत होतो की शिवसेनेसोबत अडीच वर्ष मान्य करा, तुम्हाला वाटत नव्हते तर मला मुख्यमंत्री करा, पण माझे ऐकले नाही, आता 5 वर्ष विरोधी नेते राहण्याची वेळ आली आहे, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी म्हटले आहे. (Devendra Fadnavis says Ramdas Athavale would have become the Chief Minister)

आठवले यांच्या या वक्तव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, 'आठवले यांनी योग्यवेळी योग्य लोकांचं ऐकलं असतं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमत्री झाले असते.' एवढंच बोलून फडणवीस यांनी आठवले यांच्या वक्तव्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली.

हेही वाचा : ठाकरे सरकारची आठ अधिवेशनं, कालावधी केवळ 38 दिवस!

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना आठवले म्हणले, कोरोना रुग्ण मी मी सुद्धा होतो. कोरोनाने साऱ्या जगाला नाचवले. पण, डॉक्टरांनी लाखो लोकांना वाचवले अनेक रुग्णांना रुग्णालयात पाठवले तेव्हा मला बॅाम्बे हॉस्पिटलचे दिवस आठवले. मी सुद्धा गो कोरोनाचा नारा दिला होता. त्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये असताना मला वाटले की मीच गो होतोय की काय? कोरोना झाल्यानंतरचा अनुभवही त्यांनी सांगितला. कोरोनाच्या काळात आरोग्य खाते चालवणे सोपे नसले तरी राजेश टोपे यांनी हे खाते व्यवस्थित सांभाळले आहे, असे ही आठवले यांनी सांगितले. 

शिवसेना युतीबाबत काय म्हणाले फडणवीस?

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांची भेट झाली. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजप व शिवसेना राज्यात पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सूचक वक्तव्य केलं आहे.

राऊत व शेलार यांच्या भेटीविषयी माहिती नसल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, कोणाच्या भेटीगाठी झाल्या याबाबत मला माहिती नाही. अधिकृतपणे कोणाचीही भेटगाठ नाही किंवा चर्चा नाही. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून जनतेसाठी लढाई लढण्याची आमची तयारी आहे. 

शिवसेना व भाजपच्या युतीवर बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्यात कधीच शत्रुत्व नव्हतंच. आम्ही शत्रु नाही. आमच्यात वैचारीक मतभेद झाले कारण आमचे मित्र आमचा हात सोडून ज्यांच्या विरोधात निवडून आले त्यांचाच हात पकडून निघून गेले. त्याच्यामुळे मतभेद उभे झाले. राजकारणामध्ये जर तर अर्थ नसतो. जी परिस्थिती येते त्यानुसार निर्णय होत असतात. जर तर वर जे राजकारणी राहतात ते स्वप्नच पाहत राहतात, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख