न्यायालयातील अनुपस्थिती कंगनाला महागात पडणार

अंधेरीतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर अख्तर यांच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
Court warns Kangana with arrest warrant if she fails to appear
Court warns Kangana with arrest warrant if she fails to appear

मुंबई : मुंबईतील न्यायालयानं मंगळवारी अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) ) पुन्हा दणका दिला आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्याची कंगनाची मागणी मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यानंतर मंगळवारी न्यायालयानं तिला सुनावणीला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. यापुढील सुनावणीला हजर न राहिल्यास अटक वॉरंट काढण्याचा इशाराही न्यायालयानं दिला आहे. (Court warns Kangana with arrest warrant if she fails to appear)

अंधेरीतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर अख्तर यांच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मानहानीच्या खटल्याच्या कारवाईला कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने योग्य प्रकारे हा निर्णय घेतला नाही, असा दावा कंगनाने केला होता. यावरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांनी 1 सप्टेंबरला निकाल राखून ठेवला होता. मागील आठवड्यात न्यायालयाने कंगनाची याचिका रद्दबातल ठरवली. 

या खटल्यात कंगना एकाही तारखेला हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्याची मागणीही भारद्वाज हे मागील काही सुनावण्यांपासून करत आहेत. तर कंगनाच्या वकिलांकडून विविध कारणे देत सवलत मागितली जात होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळीही कंगनाच्या वकिलांनी तिच्या प्रकृतीचे कारण देत काही दिवस सवलत देण्याची मागणी केली. पण अख्तर यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. 

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं अखेर कंगनाला हजर राहण्याची शेवटची संधी दिली आहे. ती येत्या 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर न राहिल्यास अटक वॉरंट काढण्यात येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 

काय आहे प्रकरण?

कंगनाने अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॅालिवूडमधील सुसाईड गँगमध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले होते. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला होता.कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलिस तिला वारंवार समन्स बजावत होते. परंतु ती त्याला उत्तर देत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी न्यायालयात दिली होती. या प्रकरणात कंगना एकदाही न्यायालयात सुनावणीला हजर राहिलेली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com