शिक्षण मंत्र्यांसह भाजपच्या तीन आमदारांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

आंदोलन करताना महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी शिक्षण मंत्री आणि भाजपचे तीन आमदार अडचणीत आले आहेत. या प्रकरणी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.
Court issues nonbailable warrant against Uttarakhand education minister and 3 bjp MLAs
Court issues nonbailable warrant against Uttarakhand education minister and 3 bjp MLAs

उत्तराखंड : दुसऱ्या धर्मातील महिलेला पळवून नेणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी महामार्ग रोखून धरत आंदोलन करणे नेत्यांना चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. या प्रकरणी उत्तराखंडचे शिक्षण मंत्री अरविंद पांडे आणि भाजपच्या तीन आमदारांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट उधमसिंगनगरमधील न्यायालयाने बजावला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

न्यायदंडाधिकाऱ्यांनी एकूण 16 जणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढला आहे. यात शिक्षण मंत्री अरविंद पांडे, भाजपचे आमदार हरभजनसिंग चिमा, आदेश चौहान, राजकुमारसिंह ठुकराल आणि माजी खासदार बलराज पासी यांच्यासह इतरांचा समावेश आहे. शिक्षण मंत्र्यांसह आमदारांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. 

न्यायालयाने या सर्व आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश जिल्हा पोलिसांना दिले आहेत. या सर्वांना हजर करण्यासाठी न्यायालयाने 23 ऑक्टोबरपर्यंतची मुदत न्यायालयाने दिली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणीही कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. 

राज्यात काँग्रेसचे सरकार होता त्यावेळी 2012 मध्ये भाजप नेत्यांनी आंदोलन केले होते. एका व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील महिलेले पळवून नेले होते. या व्यक्तीला अटक करावी, अशी मागणी भाजपने केली होती. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी भाजपने 2012 मध्ये जसपूर येथे महामार्ग रोखून धरत आंदोलन केले होते. या प्रकरणी आंदोलनात सहभागी नेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आता या नेत्यांना न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. 

पाटणा : बिहारमध्ये जाले मतदारसंघात डॉ. मसकूर अहमद उस्मानी यांना काँग्रेसने तिकिट दिल्याने मोठा वादंग सुरू झाला आहे. या मुद्द्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह यांनी या मुद्द्यावर काँग्रेस आणि महाआघाडीला लक्ष्य केले. काँग्रेसच्या स्टार प्रचारक दिल्ली दंगलीतील आरोपी शेरजिल इमाम असणार का, असा सवालही त्यांनी केला आहे. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या उस्मानी यांच्या उमेदवारीने बिहारमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com