चहावाला पंतप्रधान झाल्यावर दुसरं काय होणार...भोगा आता!

देशात इंधन दरवाढीची भडका उडाला असून, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीने उच्चांकी पातळी गाठली आहे.
congress mp ravneet singh bittu targets narendra modi over fuel price hike
congress mp ravneet singh bittu targets narendra modi over fuel price hike

नवी दिल्ली : अनेक राज्यांत पेट्रोलने शंभरचा टप्पा पार केला आहे. इंधन दरवाढीने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारने हात वर केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांसह पेट्रोलियम मंत्र्यांकडेही इंधन दरवाढ कधी थांबणार, या प्रश्नाचे उत्तर नाही. यावर काँग्रेसच्या खासदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. 

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे तर शंभरवर पोहचले आहेत. डिझेल आणि गॅसचे दरही सातत्याने वाढत चालले आहेत. याविरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून हात वर करण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे हे धर्मसंकट असल्याचे सांगून हात झटकले आहेत. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नसल्याची टीका आता विरोधक करु लागले आहेत. 

यावरुन पंजाबमधील काँग्रेसचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी मोदींचा उल्लेख चहावाला असा केला आहे. देशातील इंधन दरवाढीसाठी त्यांनी मोदींना जबाबदार धरले आहे. डॉ. मनमोहनसिंगांच्या जागी एक चहावाला पंतप्रधान बनला आहे त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. आता नागरिकांनी 2024 पर्यंत हे भोगण्याची तयारी ठेवावी, असे बिट्टू यांनी म्हटले आहे. 

दरवाढीविरोधात विरोधक रस्त्यावर

विरोधकांनी इंधन दरवाढीवर अनेक ठिकाणी आंदोलन केले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये स्कूटर पेटवून देत इंधन दरवाढीचा निषेध केला. तर केरळमध्ये काँग्रेसने रिक्षाला दोरी बांधून रस्त्याने फिरविली. खासदार शशि थरूर यांच्यासह अनेक केरळ काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. 

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज घरापासून मंत्रालयापर्यंत सायकलवर प्रवास करत इंधन दरवाढीचा निषेध केला. काल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सिलेंडरवर बसून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काल ई-स्कूटरवर कार्यालयात पोहचल्या. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीविरोधातील फलक गळ्यात अडकवला होता. तसेच काही अंतर त्यांनी स्वत: स्कूटर चालविली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई व उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांनीही काही दिवसांपूर्वी सायकवरून कार्यालयात गेले होते. 

Edited to Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com