गुजराल यांच्या पावलावर चार दशकांनी सिब्बल यांनी टाकलं पाऊल

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्या घरी आयोजित मेजवानीला 15 विरोधी पक्षांचे सुमारे 45 नेते एकत्र आले होते.
congress leader kapil sibal follows footsteps of inder kumar gujral
congress leader kapil sibal follows footsteps of inder kumar gujral

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या घरी नुकत्याच आयोजित मेजवानीला 15 विरोधी पक्षांचे सुमारे 45 नेते एकत्र आले होते. इंदरकुमार गुजराल (Inder Kumar Gujral) यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात 1982 मध्ये अशाच प्रकारे विरोधी पक्षांना एकत्र आणले होते. याचीच पुनरावृत्ती सिब्बल यांनी चार दशकांनंतर केली असून, मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात त्यांना यश आले आहे.

सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. इंदिरा गांधींच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम इंदरकुमार गुजराल यांनी केले होते. त्यांनी 1982 मध्ये विरोधकांना एकत्र आणले होते. यामुळे त्यांच्या विरोधात भक्कम विरोधी आघाडी उभी राहिली होती. आता सिब्बल यांनी याचीच पुनरावृत्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विखुरलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सिब्बल केला आहे. त्यामुळे या बैठकीकडे अतिशय गांभीर्याने पाहिले जात आहे. 

सिब्बल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नाराजीचे पत्र लिहिलेल्या 23 नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडूनही काँग्रेस नेतृत्वाबाबत नेहमी वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता वाढदिवसाच्या मेजवानीतच पक्षाच्या नेतृत्वावर विरोधी पक्षातील नेत्यांनीही चर्चा केली आहे. या कार्यक्रमात शरद पवार व संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते शशी थरूर, आनंद शर्मा, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, डीएमकेचे तिरूची सिवा, आरएलडीचे जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, अकाली दलाचे नरेश गुजराल आदी उपस्थित होते.  

सिब्बल यांनी या बैठकीत सुरूवात करताना भाजपवर हल्ला चढवला. भाजपकडून संस्था संपवून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. उमर अब्दुल्ला यांनी जेव्हा जेव्हा काँग्रेस मजबूत होते तेव्हा विरोधकही मजबूत बनतात, असा मुद्दा उपस्थित केला. पक्ष बळकट करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com