आमदाराने विरोधात आघाडी उघडली अन् मुख्यमंत्री म्हणाले, तो आमचा तरुण मित्रच!

बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकचा कारभार हाती घेतल्यानंतर महिन्याच्या आतच त्यांच्यासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत.
karnataka cm basavraj bommai clarifies about meeting devegowda
karnataka cm basavraj bommai clarifies about meeting devegowda

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांची नियुक्ती झाली. बोम्मई यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर महिन्याच्या आतच त्यांच्यासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान एच.डी.देवैगौडा यांची भेट घेतली होती. यावरुन गदारोळ सुरू झाला असून, भाजपच्या (BJP) आमदार प्रितम जे. गौडा यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी अखेर भूमिका स्पष्ट केली आहे. 

बोम्मई यांनी मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या आधी देवेगौडा यांची भेट घेतली होती. यावर  आमदार प्रितम जे. गौडा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व वादावर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, प्रितम गौडा हे आमचे तरुण मित्र आहेत. ते उत्साहाचा भरात काही तरी बोलले असतील. देवेगौडांसोबत कोणतीही राजकीय चर्चा मी केलेली नाही. हसनमधील सर्व लोकप्रतिनिधींनी मी भेटलो आहे. यात कोणताही वादाचा मुद्दा नाही. माध्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि आमदारांनी मी विश्वासात घेईन आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करेन.  

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. यातच खातेवाटपात महत्वाचे खाते न मिळालेले मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. आता बोम्मई यांनी माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.देवैगौडा यांची घेतलेली भेट गाजू लागली आहे. 

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची थपथ घेतल्यानंतर आठवडाभराने मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहरे आहेत. बोम्मई यांनी नुकतेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. राजीनाम्यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत येडियुरप्पाही उपस्थित होते. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com