काँग्रेसला मोठा धक्का : यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश - congress leader jitin prasada joins bjp in presence of piyush goyal | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसला मोठा धक्का : यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जून 2021

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापासून झाली होती. आता प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. 

केंद्रीय मंत्रू पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत प्रसाद यांनी प्रवेश केला. हा प्रवेशाचा कार्यक्रम दिल्लीत पक्ष मुख्यालयात झाला. त्याआधी त्यांनी भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. दरम्यान, आज सकाळी काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असे ट्विट खासदार व पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बालुनी यांनी केले होते. यामुळे मोठी चर्चा सुरू झाली होती. अखेर प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज होते. 

हेही वाचा : भाजपचा बडा नेता करणार पक्षाला रामराम? बैठकीला मारली दांडी 

राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. 

पायलट यांचेही केले होते समर्थन 
राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची पक्षाने उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. पायलट यांचे बंड अखेर चहाच्या पेल्यातील वादळ ठरले होते. त्यावेळीही जितिन प्रसाद यांनी पायलट यांची उघड बाजू घेतली होती. पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्याने त्यावेळी आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. 

Edited by Sanjay jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख