सल्लागारांमुळे प्रदेशाध्यक्ष अडचणीत; काँग्रेस हाय कमांडकडून कारवाईची तंबी

काँग्रेस हाय कमांडने सिद्धूंना तंबी देत सल्लागारांना काढून टाकण्यास सांगितले आहे. सिद्धूंनी सल्लागारांना काढून न टाकल्यास पक्ष कारवाई करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
congress instructs navjot singh sidhu to remove advisers
congress instructs navjot singh sidhu to remove advisers

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आपल्या दिमतीला ठेवलेल्या सल्लागारांमुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन सल्लागारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग या वादात उडी घेत त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता काँग्रेस हाय कमांडने सिद्धूंना तंबी देत सल्लागारांना काढून टाकण्यास सांगितले आहे. सिद्धूंनी सल्लागारांना काढून न टाकल्यास पक्ष कारवाई करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनीही सल्लागारांवरून सिद्धू यांना तंबी दिली आहे. ते म्हणाले, सल्लागारांच्या विधानांना संपूर्ण पक्ष आणि राज्याचा आक्षेप आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, ही पक्षाची भूमिका आहे. हे सल्लागार पक्षाने नेमलेले नाहीत. त्यांना काढून टाकण्यासाठी आम्ही सिद्धू यांना सूचना केलेली आहे. त्यांनी असे न केल्यास आम्ही सल्लागारांची हकालपट्टी करू. पक्षाला अडचणीत आणणारे लोक आम्हाला नको आहेत. 

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच सिद्धू यांनी चार सल्लागारांची नेमणूक केली आहे.  त्यापैकी प्यारेलाल गर्ग व मलविंदर माली यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केलं होते. माली यांनी मागील आठवड्यात काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणलं होतं. तर गर्ग यांनी थेट अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानवर केलेल्या टीकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दोन्ही सल्लागारांची वक्तव्य समोर आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. 

दरम्यान, माली यांनी नुकतेच थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेच एक वादग्रस्त चित्र फेसबुकवर टाकल्यानं काँग्रेसला धक्का बसला होता. या चित्रामध्ये मानवी कवटींच्या ढिगाजवळ इंदिरा गांधी उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या हातात एक बंदूक असून त्यालाही मानवी कवटी लटकलेली दिसत आहे. या वादग्रस्त चित्रावरून विरोधकांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच, काँग्रेसमधील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

हे चित्र एका पंजाबी नियतकालिकामध्ये जून 1989 मध्ये छापून आले आहे. 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीची आठवणं करून देणारं हे चित्र असल्यानं पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप नेते तरूण चुघ यांनी या चित्रावरून थेट सिध्दू यांच्यावर निशाणा साधला आहे. फेसबुकवर अशी पोस्ट करण्याबाबत माली यांनी सिध्दू यांना विचारले होते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com