जिल्हाधिकारी संतापले अन् तरुणाला कानाखाली लगावून त्याचा मोबाईल रस्त्यावर आपटला - chhattisgarh ias officer slaps youth for violating covid norms | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हाधिकारी संतापले अन् तरुणाला कानाखाली लगावून त्याचा मोबाईल रस्त्यावर आपटला

वृत्तसंस्था
रविवार, 23 मे 2021

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. 
 

रायपूर : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. संचारबंदी असताना लसीकरणासाठी बाहेर पडलेल्या तरुणाला जिल्हाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणाचा मोबाईलही जिल्हाधिकाऱ्यांनी संतापून रस्तावर आपटल्याचे दिसत आहे. 

ही घटना छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.२२) घडली. जिल्ह्यात लॉकडाउन आहे. जिल्हाधिकारी रणबीर शर्मा हे रस्त्यावर उतरुन लॉकडाउनची पाहणी करीत होते. त्यावेळी लसीकरण करण्यासाठी एक तरुण दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी जिल्हाधिकारी शर्मा आणि पोलिसांनी त्याला अडवले. त्याला बाहेर पडण्याचे कारण विचारण्यात आले. त्यावेळी त्याने लसीकरण करण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले. 

हेही वाचा : संचारबंदीत घराबाहेर भाजी विकणाऱ्या मुलाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू  

त्या तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची कागदपत्रे आणि मोबाईलवरील इतर कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या कानाखाली लगावून त्याचा मोबाईल रस्त्यावर आपटला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवावा, असा आदेशही पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. जिल्हाधिकारीच कायदा हातात घेऊ लागले तर इतरांनी काय करायचे, असा सवाल नेटिझन सोशल मीडियावर विचारू लागले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख