संचारबंदीत घराबाहेर भाजी विकणाऱ्या मुलाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू; दोन पोलीस निलंबित

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
vegetable seller boy died after police beat him in uttar pradesh
vegetable seller boy died after police beat him in uttar pradesh

उन्नाव : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. संचारबंदी असतानाही पोट भरण्यासाठी घराबाहेर भाजी विकणाऱ्या 17 वर्षीय मुलाचा पोलिसांचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जनतेत संताप उसळल्याने अखेर दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 24 मे रोजी सकाळी 7 पर्यंत संचारबंदी आहे. उन्नावमधील भटपुरी भागात ही घटना काल (ता.21) घडली. संचारबंदीत फैजल हुसेन हा मुलगा घरासमोर भाजी विकत होता. या मुलाला पोलिसांनी काठीने बदडत पोलीस ठाण्यात नेले. त्याला पोलीस ठाण्यातही बेदम मारहाण करण्यात आली. यात गंभीर जखमी होऊन त्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाला नंतर रुग्णालयात हलवण्यात आले परंतु, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे समोर आले. 

या घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्यांनी लखनौ रोड क्रॉसिंगवर आंदोलन सुरू केले. दोषींवर कारवाई करावी आणि संबंधित मुलाच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कुटुंबीयांची समजूत काढली. याचबरोबर दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. 

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय चौधरी, सीमावत यांना निलंबित करण्यात आले. याचबरोबर होमगार्ड सत्यप्रकाश याची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक शशिशेखर सिंह यांनी दिली. 

देशात 24 तासांत कोरोनामुळे 4 हजार 194 मृत्यू 
देशात मागील 24 तासांत 2 लाख 57 हजार 299 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 194 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या रुग्णांची संख्या साडेतीन लाखाहून अधिक आहे.  देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 62 लाख 89 हजार 290 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 95 हजार 525 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  देशातील रोजची रुग्णसंख्या 26 दिवसांनंतर पहिल्यांदाच 17 मेपासून 3 लाखांच्या खाली आली आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच वेगाने रुग्णसंख्येत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचे सूर सरकारमधून व्यक्त होत आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com