सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये; पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद शमलेला नाही.
bjp vice president claims sachin pilot will join bjp in future
bjp vice president claims sachin pilot will join bjp in future

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद शमलेला नाही. यावर काँग्रेस (Congress) नेतृत्वाला अजूनही तोडगा काढला आलेला नाही. आता पायलट हे लवकरच भाजपमध्ये (BJP) येतील, असा दावा भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी केला आहे. 

पायलट यांनी मागील वर्षी 18 आमदारांसह गेहलोत यांच्याविरुद्ध बंड केले होते. त्यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. आता भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ए. पी. अब्दुलकुट्टी यांनी पायलट यांच्या भाजप प्रवेशाची भविष्यवाणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सचिन पायलट हे अतिशय चांगले नेते आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील.

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी जून महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सचिन पायलट यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती.  त्यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या रीटा बहुगुणा जोशी यांनी पायलट लवकरच भाजपमध्ये येतील असा दावा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, पायलट हे लवकरच भाजपमध्ये येतील. माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. उत्तर भारतामध्ये काँग्रेस पक्ष आता जवळपास संपला आहे. सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज आहेत. 

याला पायलट यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी म्हटले होते की, रिटा बहुगुणा जोशी यांनी सचिनशी फोनवर बोलणे झाल्याचे म्हटले आहे. त्यांचे बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलणे झाले असावे. माझ्याशी थेटपणे बोलण्याचे धाडस त्या दाखवू शकत नाहीत.  

राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे कायम आहे. पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे. 

राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अज माकन हे नुकतेच राज्यात  दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com