येडियुरप्पांना कॅबिनेट दर्जा देण्यामागील मूळ कारण 'लकी कावेरी'

येडियुरप्पा हे माजी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे. येडियुरप्पांनी हा नाकारला असला तरी यामागील कारण समोर आले आहे.
kanataka former cm yediyurappa wants to continue in kaveri residence
kanataka former cm yediyurappa wants to continue in kaveri residence

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) हे मुख्यमंत्री झाले आहेत. येडियुरप्पा हे माजी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे. येडियुरप्पांनी हा नाकारला असला तरी यामागील प्रमुख कारण 'लकी कावेरी' (Kaveri) असल्याचे समोर आले आहे.  

येडियुरप्पा हे आता माजी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला होता. याबाबतचा आदेश राज्य सरकारने काढला होते. बोम्मई हे राज्याचे मुख्यमंत्री असेपर्यंत येडियुरप्पांना कॅबिनेट मंत्र्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळणार होत्या. येडियुरप्पांना नाराज न करण्याची भूमिका भाजप नेतृत्वाने सुरवातीपासून घेतली आहे. यामुळेच त्यांचे निकटवर्तीय बोम्मई हे मुख्यमंत्री झाले. त्यांना कॅबिनेट मंत्र्यांच्या सर्व सुविधा देऊन पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने ते नाराज होऊ नयेत, याची काळजी घेतली होती. 

येडियुरप्पांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आता नाकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे कावेरी हे शासकीय निवासस्थान  कायम राहावे, यासाठी बोम्मई सरकारने हा निर्णय घेतला होता. येडियुरप्पा सध्या कावेरीमध्ये राहत आहेत. येडियुरप्पांना हे निवासस्थान स्वत:कडे ठेवायचे होते. यासाठी ते आग्रही होते. राज्यातील सत्ताकेंद्रापासून हे निवासस्थान जवळ आहे. राज्यात 2018-19 मध्ये धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये एच.डी.कुमारस्वामी हे मुख्यमंत्री बनले. तरीही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कावेरीमध्येच राहात होते. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा नव्हता. परंतु, हे निवासस्थान आघाडीतील मंत्री के.जे.जॉर्ज यांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात या निवासस्थानी सिद्धरामय्या राहत होते. 

भाजपने 2019 मध्ये सत्ता स्थापन करुन येडियुरप्पा मुख्यमंत्री झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी हे कावेरी सोडले. सिद्धरामय्या यांना कावेरी लकी ठरले होते. देवराज ऊर्स यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे सिद्धरामय्या एकमेव मुख्यमंत्री आहेत. यामुळे येडियुरप्पांनी या निवासस्थानाला महत्व दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री बोम्मई हे शासकीय निवासस्थानाऐवजी आरटीनगर त्यांच्या कौटुंबिक निवासस्थानातून कारभार पाहत आहे. मुख्यमंत्री बोम्मईंचे पिता माजी मुख्यमंत्री एस.आर.बोम्मई यांना सरकारने दिलेल्या जागेवर हे निवासस्थान आहे. बोम्मई यांनी दिलेला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा येडियुरप्पांनी नाकारला असला तरी ते कावेरी सोडणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

हेही वाचा : सर्वच मंत्र्यांना मनसारखं खातं मिळणार नाही! मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं 

राज्यातील भाजप (BJP) सरकारच्या द्विवर्षपूर्ती दिवशीच येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांना अश्रू आवरता आले नव्हते. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com