चिकन, मटण, फिशपेक्षा बीफ खाण्यावर भर द्या! भाजपच्या मंत्र्याचाच उपदेश

भाजपकडून गोहत्या विरोधी कायदा करण्यात आला असला तरी भाजपचाच मंत्री आता गोमांस खाण्याचा उपदेश करु लागला आहे.
bjp minister from meghalaya says eat beef more than chicken fish
bjp minister from meghalaya says eat beef more than chicken fish

शिलाँग : भाजपकडून (BJP) गोहत्या विरोधी कायदा करण्यात आला असला तरी भाजपचाच मंत्री आता गोमांस खाण्याचा उपदेश करु लागला आहे. मासेट मटण आणि चिकन खाण्यापेक्षा बीफ (Beef) खाण्यावर भर द्यावा, असा मंत्र त्यांनी दिला आहे. लोकशाही असलेल्या देशात कोणीही काहीही खाण्यास स्वतंत्र आहे, असा घरचा आहेरही त्यांनी पक्षाला दिला आहे. 

भाजप नेते व मेघालयचे (Meghalaya) पशुसंवर्धन मंत्री सनबॉर शुल्लाई (Sanbor Shullai) यांनी हा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील जनतेने चिकन, मटण, माशापेक्षा जास्त बीफ खावे. लोकशाही असलेल्या आपल्या देशात कुणीही काहीही खाण्यास स्वतंत्र आहे. भाजपकडून राज्यात गोहत्या बंदी केली जाईल, अशी भीती जनतेमध्ये पसरली आहे. ही माहिती चुकीची आहे. असे काही घडणार नाही. 

आसामने नवा गोरक्षण कायदा आणला आहे. यामुळे शेजारील मेघालयमध्येही असाच कायदा लागू केला जाईल, अशी चर्चा सुरू आहे. राज्यातील बहुतांश जनतेच्या आहारात गोमांसाचा समावेश आहे. मंत्री शुल्लाई यांचा मागील आठवड्यातच मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. जनतेच्या मनात निर्माण झालेली अकारण भीती दूर करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

मंत्री शुल्लाई म्हणाले की, आसाममध्ये गोरक्षण कायदा लागू केला असला तरी त्याचा कोणताही परिणाम आपल्या राज्यावर होणार नाही. मी याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांच्या राज्यात कायदा लागू असला तरी ते आपल्या राज्यासाठी होणारी गुरांची वाहतूक ते बंद करणार नाहीत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com