निलेश राणे म्हणाले, भास्कर जाधव खोटारडे..त्यांनी आईबहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या! - bjp leader nilesh rane slams shivsena leader bhaskar jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

निलेश राणे म्हणाले, भास्कर जाधव खोटारडे..त्यांनी आईबहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या!

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जुलै 2021

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत झालेल्या गोंधळाचे पर्यावसान आज राजकीय युद्धात झाले. 

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून विधानसभेत झालेल्या गोंधळाचे पर्यावसान आज राजकीय युद्धात झाले. आईबहिणीवरून शिवीगाळ झाल्याची तक्रार तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली. यानंतर संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या बारा सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आणि तो बहुमताने मंजूर झाला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांना त्यांच्याच गावात मंदिरातील कार्यक्रमात बोलावण्यात न आल्यामुळे वाद झाला होता. त्यावेळी गावकऱ्यांना जाधवांनी शिवीगाळ केली, असा आरोपही करण्यात आला होता. हाच धागा पकडून निलेश राणे यांनी जाधवांना लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, या भास्कर जाधवांना खोटं बोलायची सवय आहे. त्यांच्या गावात मंदिराच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलावलं नाही म्हणून स्वतःच्या गावात गावकऱ्यांना आईबहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या व तसेच, अंगावर धावूनही गेले होते. भास्कर जाधव हे टपोरीरखा कोणाचीही कळ काढत बसतात म्हणून शिव्या दिल्या असतील, सवय आहे त्यांना.

गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, राम सातपुते, जयकुमार रावळ, नारायण कुचे, किर्तीकुमार बांगडिया, पराग आळवणी, हरिष पिंपळे, योगेश सागर यांना एक वर्षासाठी निलंबित कऱण्यात आले. तसेच त्यांना मुंबई आणि नागपूरच्या विधानभवनाच्या आवारात येण्यास मनाई घातली. 

हेही वाचा : विशेष न्यायालयाच्या दणक्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पांची खुर्ची धोक्यात 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांत जोरदार चकमक झाली. काही सदस्यांनी डायसवरून माईक हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या केबिनमध्ये बैठक झाली. तेथे जाधव यांना शिवीगाळ झाली.

या साऱ्या मुद्यांबाबत भास्कर जाधव यांनी सभागृहात निवेदन केले. ते म्हणाले की मराठा आरक्षण, वैधानिक विकास मंडळ असे सर्व महत्वाचे ठराव चर्चा न करता मंजूर करतो. अधिकचे काही मुद्दे टाकायचे असतील तर दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून तो ठराव सभागृह मंजूर करते. ओबीसींच्या आरक्षणाबाबतचा ठरावबाबत असे झाले नाही. भुजबळ यांनी ठराव मांडण्यापूर्वीच विरोधी नेते फडणवीस यांनी त्यास हरकत घेतली. मी त्यांना अडविले नाही. त्यांना बोलू दिले. त्या वेळी काही विरोधी सदस्य वेलमध्ये आले. त्या सदस्यांना मी मागे जायला सांगितले. मात्र फडणवीस यांनी त्यांना मागे जायचे नाही, असे सांगिल्याचे मी स्वतः ऐकले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख