न्यायालयाचा अवमान करणाऱ्या दोन आयएएस अधिकाऱ्यांना तुरूंगवासाची शिक्षा

ग्रामीण भागातील उद्यान विभागातील 36 कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
Andhra pradesh High court had sentenced two IAS officers to one week jail
Andhra pradesh High court had sentenced two IAS officers to one week jail

अमरावती : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे दोन आयएएस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. आदेशाचे पालन न केल्याने अवमान केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने त्यांना थेट आठवडाभराच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. पण राज्य सरकार या अधिकाऱ्यांसाठी धावून आले अन् एक दिवसांत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं लेखी आश्वासन न्यायालयाला दिल्याने ही शिक्षा मागे घेण्यात आली. (Andhra pradesh High court had sentenced two IAS officers to one week jail)

ग्रामीण भागातील उद्यान विभागातील 36 कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्याचे आदेश आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. एप्रिल महिन्यात हे आदेश देण्यात आले होते. याबाबत उच्च न्यायालयाकडून वारंवार सुचना देण्यात आल्या. पण गिरीजा शंकर व चिरंजीवी चौधरी या आएएस अधिकाऱ्यांची आदेशाची अंमलबजावणी केली नाही.

मंगळवारी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने 36  कर्मचाऱ्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढले. त्यानुसार मंगळवारी सुनावणीवेळी हे दोन अधिकारीही उपस्थित होते. यावेळी संतापलेल्या न्यायालयाने दोन अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेत त्यांना थेट आठवडाभराची शिक्षा सुनावणी. तसेच एक हजार रुपयांचा दंडही केला. 

त्यानंतर सरकारकडून तातडीने न्यायालयाला लेखी आश्वासन देण्यात आले. बुधवारपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचे आदेश काढले जातील, असं आश्वासन सरकारकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर न्यायालयाने दोन अधिकाऱ्यांची शिक्षा मागे घेतली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com