सिद्धूंना मुख्यमंत्री केल्यास खबरदार..! कॅप्टनचा जाहीर इशारा

पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांना मुख्यमंत्री बनवण्यास त्यांनी जाहीर विरोध केला आहे.
amarinder singh oppose navjot singh sidhu name for punjab cm
amarinder singh oppose navjot singh sidhu name for punjab cm

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना राजीनामा दिला आहे. नवीन मुख्यमंत्री  निवडीसाठी काँग्रेस (Congress) हाय कमांडने तातडीने आज सायंकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर अमरिंदरसिंग यांनी संतापून पक्ष नेतृत्वाला जाहीर इशारा दिला आहे.  

अमरिंदरसिंग यांनी आज राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. यानंतर सिद्धू यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रिपदासाठी होऊ लागली आहे. सिद्धू यांच्यासोबत झालेल्या वादातून अखेर अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपद गमावावे लागले होते. यावर अमरिंदरसिंग यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सिद्धू यांच्याकडे ही जबाबादारी देऊ नये, असा उघड इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे पक्ष नेतृत्व कोंडीत सापडले आहे. 

अमरिंदरसिंग म्हणाले की, देशाच्या हितासाठी मी सिद्धू यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यास विरोध करीत आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सिद्धू यांचे चांगेल मित्र आहेत. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशीसिद्धू यांचे संबंध आहेत. 

नवज्योतसिंग सिद्धू हा अकार्यक्षम व्यक्ती आहे. तो मोठे संकट निर्माण करेल. पुढील मुख्यमंत्री म्हणून माझा सिद्धू यांना विरोध असेल. त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. ते राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका ठरतील, असेही अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.  

आमदारांची बैठक आज होत आहे. केंद्रीय निरीक्षक म्हणून हरीश चौधरी आणि अजय माकन हे राज्यात दाखल झाले आहेत. पक्षाच्या अनेक आमदारांनी अमरिंदरसिंगांनी बदलण्याची मागणी लावून धरली होती. त्यांचे वारंवार पक्ष नेतृत्वाशीही खटके उडू लागले होते. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने पक्ष नेतृत्वाला लवकरात लवकर या वादावर तोडगा काढायचा आहे. आजच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com