गेहलोत-पायलट वादावर फॉर्म्युला ठरला; मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाउन सुरू

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलटयांच्यातील वाद लवकरच मिटण्याची शक्यता आहे.
after ajay maken meeting with ashok gehlot countdown for cabinet starts
after ajay maken meeting with ashok gehlot countdown for cabinet starts

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद लवकरच मिटण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे राजस्थान प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस अजय माकन (Ajay Maken) यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याबरोबर याच आठवड्यात दोन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असून, गेहलोत-पायलट वादावर तोडगा निघाल्याचे मानले जात आहे. 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला होता. राजस्थानध्ये  मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली होती. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला होता.

अजय माकन यांनी या आठवड्यात दोन वेळा मुख्यमंत्री गेहलोत यांच्याशी जयपूरमध्ये चर्चा केली. आता ते दिल्लीला रवाना झाले आहेत. गेहलोत यांच्याशी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या फॉर्म्युलावर चर्चा केली होती. आता ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत. पुढील आठवड्यात ते राज्यात परतणार आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर माकन हे राज्यात  दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. 

पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट यांच्यासह 18 आमदार दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. काँग्रेस नेतृत्वाने विविध मागण्यांवर कार्यवाही करण्याचा शब्द दिल्यानंतर पायलट यांच्यासह काँग्रेस आमदार परतले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com