अदर पूनावालांच्या प्रयत्नांना यश; जो बायडन यांनी घेतला मोठा निर्णय

देशात कोरोना लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच अमेरिकेने कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल रोखून धरला होता.
adar poonawalla thanks joe biden for lifting embargo on vaccine raw material
adar poonawalla thanks joe biden for lifting embargo on vaccine raw material

नवी दिल्ली : देशात कोरोना लशीचा (Covid Vaccine) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच अमेरिकेने (USA) कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल (Raw material) रोखून धरला होता. यावर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्याकडे मदतीची याचना केली होती. अखेर त्यांची ही मागणी मान्य झाली असून, याबद्दल त्यांनी बायडन आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे आभार मानले आहेत. 

अदर पूनावाला यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोना लशीच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल निर्यात करण्यावरील निर्बंध अमेरिकेने उठवले आहेत. याचा फायदा भारत आणि जगातील इतर देशांना होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष, व्हाईट हाऊस, भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी धोरणातील या बदलासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मी आभारी आहे. यामुळे आमचे लस उत्पादन वाढणार असून, कोरोना महामारीविरोधातील आमच्या लढ्याला आणखी बळ मिळेल.

याआधी कच्च्या मालासाठी पूनावालांनी थेट अमेरिकेच्या अध्यक्षांना ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेचे आदरणीय अध्यक्ष, आपण सर्वांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करीत आहे. अमेरिकेने लशीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध उठवावेत. असे घडल्यास लस उत्पादनाचा वेग वाढेल. तुमच्या प्रशासनाकडे यासंदर्भातील सर्व तपशील आहेत. 

युरोप आणि अमेरिकेने कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली. यामुळे भारतातील कोरोना लशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मला शक्य असते तर मीच अमेरिकेत जाऊनही याचा निषेध नोंदवला असता. अमेरिका आणि युरोपने भारत आणि इतर देशांतील कोरोना लस उत्पादनासाठीचा कच्चा माल रोखून धरला आहे, असेही पूनावाला यांनी याआधी बोलताना म्हटले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com