कोरोनाबाधित सासूबाईंनी सूनबाईला मारली मिठी अन्...

एका महिलेला कोरोना संसर्ग झाल्यानंतर घरच्यांनी पाळलेल्या सोशल डिस्टन्सिंगला वैतागून सुनेलाच मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
covid positive woman in telangana hugs daughter in law
covid positive woman in telangana hugs daughter in law

हैदराबाद : देशात कोरोना (Covid-19) संसर्गाचा दुसरी लाट आली असून, दररोज लाखाहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) पालन करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. परंतु, एका महिलेला (Woman) कोरोना संसर्ग झाल्यानंतर घरच्यांनी पाळलेल्या सोशल डिस्टन्सिंगला वैतागून सुनेलाच (Daughter in law) मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

ही घटना तेलंगणमधील कामारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. सोमरीपेटा गावातील एका वृद्ध महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. तिला घरापासून दूर काही अंतरावर विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याच ठिकाणी तिला खाण्यास दिले जात होते. त्यावेळी तिला तिच्या नातवांनाही भेटण्यासही दिले जात नव्हते. यामुळे ती वैतागली होती. घरातील एकही सदस्य तिच्या जवळ येत नसल्याने तिची त्रागा होत होता. 

यामुळे वैतागून तिने सुनेला मिठी मारली. मी मेल्यावर तुम्हाला आनंदाने राहायचे आहे का, असेही ती म्हणाली. यानंतर सूनही कोरोना पॉझिटिव्ह आढळली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला घराबाहेर काढण्यात आले. अखेर सुनेच्या बहिणीने येऊन तिला सोबत नेले. सध्या सुनेवर उपचार सुरू आहेत. ती तिच्या आई-वडिलांच्या घरी विलगणीकरणात आहे. 

आता सुनेच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी संबंधित वृद्धेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतरांना जाणीवपूर्वक कोरोनाचा संसर्ग पसरवणे आणि सून व तिच्या दोन मुलांना घराबाहेर काढल्याप्रकरणी वृद्धा आणि तिच्या पतीवर कारवाई करावी, अशी मागणीही गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in