ममतांचा वारसदार ठरला...अभिषेक बॅनर्जींचा अखेर 'राज्याभिषेक'

अभिषेक बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेसच्याराष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
abhishek banerjee appointed as general secretary of trinamool congress
abhishek banerjee appointed as general secretary of trinamool congress

कोलकता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक वेळा भाजप (BJP) नेत्यांनी खासदार अभिषेक बॅनर्जींचे (Abhishek Banerjee) नाव घेतले असेल. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे असलेले अभिषेक हे मागील काही काळापासून पडद्यामागे होते. आता ममतांनी त्यांना पुढे आणले असून, त्यांच्यावर थेट पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची (General Secretary) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

तृणमूल काँग्रेसची महत्वाची बैठक आज सुरू आहे. या व्हर्च्युअल बैठकीला पक्षाचे आमदारही उपस्थित आहेत. निवडणूक निकालानंतर आमदारांची ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीला ममतांचे रणनीतीकार प्रशांत किशोर हे सुद्धा उपस्थित आहेत. याच बैठकीत अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यावर शिक्कामोर्तब झाले. याचबरोबर पक्षाच्या युवा विभागाच्या अध्यक्षपदी अभिनेत्री सयोनी घोष यांची निवड करण्यात आली आहे. याचवेळी कुणाल घोष यांची राज्य सरचिटणीसपदी निवड झाली आहे. 

अभिषेक यांच्याकडे सध्या पक्षाच्या युवा विभागाचे अध्यक्षपद होते. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांची आता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली आहे. तृणमूलमध्ये एक नेता एक पद असे धोरण आहे. यानुसार त्यांनी युवा विभागाची जबाबदारी सोडली आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी ममतांनी सोपवली आहे. या घडामोडीमुळे ममतांचा वारसदार कोण, या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाल्याचे मानले जात आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले होते. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 213 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. या वेळी 77 जागांसह भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी सत्ता स्थापन केली. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com