तिहेरी हत्याकांड : दोन सख्या भावांसह तिघांच्या हत्येनं सांगलीत खळबळ

पुर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे.
Murder of three people including two brothers in Sangli
Murder of three people including two brothers in Sangli

सांगली : पलूस तालुक्यातील दुधोंडीमध्ये दोन गटात जोरदार राडा झाला असून यामध्ये एकमेकांवर धारधार शस्र्त्राने वार करण्यात आले आहेत. यात तिघांचा मृत्यू झाल्याने तालुका हादरून गेला आहे. हे तिहेरी हत्याकांड वसंतनगर परिसरात घडले आहे. पुर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे. (Murder of three people including two brothers in Sangli)

या हल्यात सनी आत्माराम मोहिते (वय 28), विकास आत्माराम मोहिते (वय 32) आणि अरविंद बाबूराव साठे (वय 52. तिघेही रा. दुधोंडी) यांचा मृत्यू झाला आहे. अन्य तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संग्राम विकास मोहिते (वय 17), आकाश आत्माराम मोहिते (वय 28) आणि दिलीप आनंदा साठे (वय 42) अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर त्याबाबत कुंडल पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारी एका गटातील संशयित आरोपी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गावात आले. रात्री झालेल्या वादानंतर पोलिसांत तक्रार का केली अशी विचारणा या आरोपींनी केली. यातून वाद वाढत जात शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. 

हा वाद टोकाला गेला आणि आरोपींनी धारदार शस्त्रे, काठ्या, लोखंडी पाईपने मारहाण केली. सनी मोहिते, अरविंद साठे आणि विकास मोहिते यांना जबर मार बसल्याने ते मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. आरोपी पळून गेल्यानंतर तिघांना तातडीनं सांगलीला हलवण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयितांपैकी काही ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान, संशयित आरोपींमध्ये प्रविण विलास मोहिते, आदित्य विलास मोहिते, हिम्मत मधुकर मोहिते, विजय मधुकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगिता मधुकर मोहिते, मधुकर धोंडीराम मोहिते आदींचा समावेश आहे. 

दुधोंडी गावात फौजफाटा

दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तिहेरी हत्याकांड घडल्याने दुधोंडी गाव हादरून गेलं आहे. त्यामुळे परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मृतांमध्ये दोन भावांचा समावेश असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातही पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com