कुणी अंगावर आलं तर त्याला सोडत नाही! फडणवीसांनी दिला इशारा

आम्हाला कोणी थपडा देण्याची धमकी देऊ नये. अशी एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.
Devendra Fadnavis slams Shivsena over Prasad Lads comment
Devendra Fadnavis slams Shivsena over Prasad Lads comment

मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावरून मोठं राजकारण सुरू झालं आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी लाड यांच्यासह भाजपवर पलटवार करत जोरदार हल्ला चढवला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही झापड लगावण्याचा इशारा देत या वादात उडी घेतली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कुणी अंगावर आलं तर सोडत नाही, असं म्हणत शिवसेनेचे नाव न घेता टोला लगावला आहे. (Devendra Fadnavis slams Shivsena over Prasad Lads comment)

बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री आक्रमक झाले होते. ते म्हणाले, आतापर्यंत टीका ऐकण्याची खूप सवय झाली आहे. कुणी कौतुक केली की भिती वाटते. एका चित्रपटाचा डायलॅाग आहे, थप्पड से डर नहीं लगता. अशा थपडा खालेल्याही आहेत आणि त्यापेक्षा दामदुपटीने दिलेल्याही आहेत. यापुढेही देऊ. आम्हाला कोणी थपडा देण्याची धमकी देऊ नये. अशी एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही. तो शिवसैनिकांच्या रक्तातील गुण आहे. हा लढवय्याचा गुण, हा आवाज उठलाच पाहिजे. हा आवाज उठला नाही तर या आवाजाला काही किंमत नाही. 

तर फडणवीस यांनी लाड यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही. मात्र, त्यांनी शिवसेनेला इशारालाही दिला. तोडफोड करणं ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आम्ही कधीही तोडफोड करत नाही. प्रसाद लाड यांचं कालच वक्तव्य जे आलं, त्यानंतर त्यांनी तात्काळ एका व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा केला आहे. त्यामुळं आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, तोडफोड करणं ही भाजपची संस्कृती नाही. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. कुणी अंगावर आलं तर त्याला सोडतही नाही, असं विधान फडणवीस यांनी केलं आहे. 

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

भाजपची ताकद काय आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिले. कारण, त्यावेळी जी भाजप होती, भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील आपल्या सोबत आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपमध्ये आला आहे. त्यामुळे भाजपची ताकद ही निश्चितच वाढली आहे. 

नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच जास्त येतात. फक्त त्यांना सांगायचे की वर्दी घालून पाठवू नका, त्यामुळे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती आमची की त्यांना असे वाटते की हे माहीममध्ये आले, म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू'', असे लाड म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com