शिवसेना आमदार संजय रायमूलकरांची धरणात उडी

पाटबंधारेच्या अधिकाऱयांना सुचना देऊनही कार्यवाही न झाल्याने संतापलेल्यारामूलकरांनी हा पवित्रा घेतला.
Shiv Sena MLA Sanjay Raimulkar jumps into the dam
Shiv Sena MLA Sanjay Raimulkar jumps into the dam

बुलडाणा : पेन टाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळं शेतजमीनीचे मोठं नुकसान होत आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱयांना सुचना देऊनही कार्यवाही न झाल्याने संतापलेले शिवसेना आमदार संजय रायमूलकरांनी थेट धरणात उडी घेतली. आता त्यांनी धरणाच्या पाण्यातच आंदोलन सुरू केलं आहे. (Shiv Sena MLA Sanjay Raimulkar jumps into the dam)

पेन टाकळी हा मध्यम प्रकल्प मेहेकर तालुक्यात आहे. या प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने सुमारे 272 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत आहे. यामध्ये 289 शेतकरी बाधित झाले असून त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेऊन पाटबंधारे अधिकाऱ्यांना स्प्ष्ट सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना त्यांनी केली होती.

पण पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव न पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी आज पेन टाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतली. त्यांनी तिथेच आंदोलन सुरू करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 

यावर प्रतिक्रिया देताना रायमूलकर म्हणाले, दरवर्षी शेतकरयांच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी किती काळ आर्थिक झळ सहन करायची ? आता प्राण गेला तरीही बेहत्तर मात्र पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवणार आहे. पावसाच्या दिवसात जीवाची पर्वा न करता आपण आंदोलन करीत आहोत, असे रायमूलकर म्हणाले. 

पावसाळ्यात कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यामुळे पिकांचे व जमिनीचे नुकसान होत आहे. आता जोपर्यंत कालवा दुरस्तीचा निर्णय होत नाही तोपर्यंत धरणाच्या बाहेर येणार नाही अशी भूमिका रायमूलकर यांनी घेतली आहे. यावेळी तिथे पाटबंधारे विभागातील एकही अधिकारी उपस्थित नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com