विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव सुचवत राज ठाकरेंकडून शिवसेनेची कोंडी - Raj Thackeray suggested Shivaji Maharajs name to the Navi Mumbai airport | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव सुचवत राज ठाकरेंकडून शिवसेनेची कोंडी

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 जून 2021

नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

मुंबई : नवी मुंबई होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाम आहेत. तर स्थानिकांनी दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. यावरून स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्दयावरून शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. त्यांनी विमानतळाला शिवाजी महाराजांचेच राहणार असल्याचे आज स्पष्ट केलं. (Raj Thackeray suggested Shivaji Maharajs name to the Navi Mumbai airport)

नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्या नावावरच जोर देण्यात आल्याने मुख्यमंत्री बैठकीतून उठून गेले होते. त्यामुळं सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. येत्या 24 जूनला सिडको इमारतीला घेराव घालण्यात येणार आहे. 

हेही वाचा : शरद पवार अन् प्रशांत किशोर यांची दिल्लीत खलबतं; राजकीय चर्चांना उधाण

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. ते म्हणाले, नवी मुंबईत विमानतळ होणार असले तरी ते सध्याच्या मुंबईतील विमानतळाचे एक्सटेन्शन आहे. त्यामुळे या विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे. आता विमानतळावर विमान पार्किंगसाठीही जागा नाही. त्यामुळे हे विमानतळ तिथे वाढविले आहे. 

बाळासाहेब असते तर त्यांनही महाराजांचं नाव सुचवलं असतं. महाराजांचं नाव आल्यावर संघर्षच होणार नाही. त्यावर चर्चा करण्याची गरजही नाही. प्रशांत ठाकूर यांनीही महाराजांचं नाव येणार असेल तर आमचा विरोध नसेल, असं सांगितलं आहे. ज्यांना यावर राजकारण करायचं आहे त्यांनी राजकारण करावं. मी बोलल्यावर आता कोण बोलत आहे, हे बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापुढे दुसरं कुणाचंही नाव येऊ शकत नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी २००८ पासून केली जात आहे. तर राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतला आहे. या ठरावाला रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील अनेकांनी विरोध असल्याचा समितीचा दावा आहे. 

येत्या २४ जूनला प्रकल्पग्रस्तांच्या सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीकडून सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी रविवारी बैठक घेतली. बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी दि. बां.चे नाव देण्यास वेगळा पर्याय असेल तर सुचवा, अशी सूचना केली. समितीने दि. बां.च्या नावाचा पुनरुच्चार केल्यानंतर मुख्यमंत्री उठून निघून गेले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख