Satyajit Tambe News : सत्यजीत तांबे थोरातांचे टेन्शन आणखी वाढवणार...लवकरच भाजप प्रवेश?

Satyajit Tambe News : सत्यजीत तांबे यांना भाजपची अट...
Satyajit Tambe, Devendra Fadnavis, Balasaheb Thorat
Satyajit Tambe, Devendra Fadnavis, Balasaheb Thorat Sarkarnama

Satyajit Tambe News : विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक पदवीधरमध्ये (Nashik Graduate Election) मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर करुनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी काँग्रेसला झटका देत अपक्ष अर्ज भरला. यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघाची चर्चा राज्यभरात होत आहे. अशातच पुन्हा या मतदार संघात भूकंप होणार असल्याची चर्चा आहे.

सत्यजित तांबे यांचा दोन-चार दिवसांत भाजपमध्ये (BJP) प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला त्याबाबत विनंती केली असून लवकरच हा पक्षप्रवेश होईल, असे भाजपच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने (Congress) डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे टेन्शन वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

Satyajit Tambe, Devendra Fadnavis, Balasaheb Thorat
Kasaba-Chinchwad By-Election: `एमआयएम`ही रिंगणात, कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक तिरंगी होणार`

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ''अशा चांगल्या माणसांना मोकळे ठेवू नका... नाहीतर आमचा डोळा राहतो, चांगले नेते भाजपला हवे आहेत, असे म्हटले होते. तर 'सरकारनामा'च्या कार्यक्रमातही सत्यजीत यांनी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मदत करावी, असे सुतोवाच केले होते. तेव्हापासूनच सत्यजीत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, सत्यजीत यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता सत्यजीत यांना भाजपचा पाठिंबा हवा असल्यास, भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे. सुधीर तांबे यांचा मात्र सध्या तरी भाजपमध्ये प्रवेश होणार नसल्याची माहिती आहे.

डॉ. तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची चांगली बांधणी केली आहे. मात्र, सत्यजित हे भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसच्या मतदारांची मते मिळतील का, हा प्रश्न आहे, सत्यजित यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. सत्यजित तांबे यांना पाठिंबा हवा असल्यास पक्षात प्रवेश करण्याचा पर्याय भाजपने त्यांना दिला आहे. तेही त्यास अनुकूल असून लवकरच तांबे यांचा भाजपप्रवेश होईल, असे सांगितले जात आहे.

Satyajit Tambe, Devendra Fadnavis, Balasaheb Thorat
Karuna Munde News : काल पोलिस अधिक्षकांकडे तक्रार, आज करुणा शर्मा यांच्याविरोधातच परळीत गुन्हा दाखल..

भाजपने नाशिक मतदार संघात उमेदवार दिलेला नाही. तसेच ज्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. त्याचे अर्ज मागे घेतले आहेत. सध्या भाजपने सत्यजीत तांबे यांना जाहीर पाठिंबा दिला नसला तरी त्यांचा प्रचार सुरु केला असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आपली ताकद सत्यजीत यांच्या पाठीशी उभी करत आहे. त्यामुळे त्याचा लवकरच भाजप प्रवेश होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in