Uddhav Thackeray News : ठाकरेंनी वाढवले शिंदे गटातील आमदारांचे टेन्शन; पुढील काळात आणखी प्रवेश अन् सभा होणार...

Uddhav Thackeray Shivsena : महाडच्या माजी नगराध्यक्षा व काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Uddhav Thackeray Konkan News : महाडच्या माजी नगराध्यक्षा व काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या मतदार संघात ठाकरे गटाने शक्तीप्रदर्शन केले. तसेच पुढील काही दिवसात आणखी प्रवेश होणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. या वेळी स्नेहल जगताप, काँग्रेसचे (Congress) जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जगताप व महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे महाड मतदारसंघात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray : ठाकरेंनी शिंदे गटातील आणखी एका आमदाराला घेरले; गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात जगतापांचा प्रवेश अन् सभाही...

महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर महाड मतदारसंघात ठाकरे गटाची कोंडी झाली होती. मात्र, जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे गोगावले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटातील अनेक आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत.

महाडमधील सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज हा प्रवेश झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अनेक सभा आहेत. त्यामध्ये अनेक प्रवेश होणार आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांची 'शिवसंवाद' आणि 'निष्ठा' यात्रेच्या माध्यामतून राज्यभर दौरे केले. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी 'प्रबोधन' यात्रा काढली. या यात्रांच्यानंतर आता स्वत: उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत.

Uddhav Thackeray News
Rohit Pawar On Solapur Ncp : होय साहेब, सोलापूर राष्ट्रवादीतील भाकरी फिरवायची वेळ आली आहे : रोहित पवारांची पवारांकडे जाहीर मागणी

उद्धव ठाकरे यांनी पहिला सभा कोकणातील खेडमध्ये घेतली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभा अनेक ठिकाणी झाल्या. त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांच्याही अनेक सभा झाल्या. त्या सभांच्या माध्यमातून त्यांनी इतर पक्षातील नेत्यांना शिवसेनेत आणले. खेडमध्ये संजय कदम यांनी राष्ट्रवादीतून (NCP) शिवसेनेत प्रवेश केला. तसचे मालेगावमध्ये झालेल्या सभेआधी भाजपचे नेते अद्वेत हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. हिरे यांनी प्रवेशानंतर पहिल्याच बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री दादा भुसे यांचा पराभव केला.

त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची पुढील सभा शिंदे गटातील कोणत्या आमदाराच्या मतदारसंघात होते आणि त्यामध्ये कोणत्या नेत्यांचे प्रवेश होतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. शिवसेनेला पुन्हा भरारी देण्यासाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी आणि नवीन नेत्यांचे प्रवेश यामुळे शिंदे गटातील आमदारांचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com