Sharad Pawar Maharashtra Tour : शरद पवार अखेर मैदानात उतरलेच; जळगाव, आंबेगाव अन्‌ कोल्हापुरात होणार स्वाभिमान सभा

NCP News : जळगावनंतर शरद पवार हे त्यांचे मानसपुत्र मानले जाणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदासंघात जाणार आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाशी कोणताही समझोता करायचा नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला असून राज्यात सभांचा धडाका लावला आहे. पवार आता अजितदादा गट आणि भाजपच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. येवला, बीडमधील सभांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून शरद पवार गटाचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. त्यातूनच पवारांनी आपल्या पुढील स्वाभिमान सभा जाहीर केल्या आहेत. (Sharad Pawar's next Sabha's will be held in Jalgaon, Ambegaon and Kolhapur)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या स्वाभिमान सभा आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण, येत्या ४ सप्टेंबर रोजी पवार यांची जळगावात सभा होणार आहे. त्या ठिकाणी ते अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांचा समाचार घेतील. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघातून ते निवडून येतात. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे प्रतोद बनविले होते. त्यानंतर त्यांनी अजितदादांना साथ दिली, त्यामुळे त्यांच्यावर पवार काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar Ambegaon Meeting: भुजबळ, मुंडेंनंतर आता वळसे पाटलांचा नंबर; आंबेगावात लवकरच सभा घेण्याचा पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द

जळगावनंतर शरद पवार हे त्यांचे मानसपुत्र मानले जाणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदासंघात जाणार आहेत. मंचर या ठिकाणी सभा घेण्याचा शब्द खुद्द पवार यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. पदांच्या बाबत पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्याला कायम झुकते माप देऊनसुद्धा..... अशा शब्दांत पवारांनी वळसे पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे सहकार मंत्र्यांना कोणत्या शब्दांत पवार सुनवतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar Sabha : आता वेळ आलीय.... चुकीच्या लोकांना आवरायची; शरद पवारांचा निशाणा कोणावर?

वळसे पाटील यांच्या मतदारसंघानंतर शरद पवार हे कोल्हापुरात सभा घेणार आहेत. कोल्हापूर आणि शरद पवार हे वेगळे नाते आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कोल्हापूरने पवारांना कायम साथ दिली आहे. सदाशिराव मंडलिक यांच्या रुपाने कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादीचा खासदार निवडून दिलेला आहे. तसेच इचलकरंजी मतदारसंघातून निवेदिता माने यांना निवडून दिले होते. कोल्हापूरचे दोन्ही खासदार हे राष्ट्रवादीचे होते.

Sharad Pawar
Sandeep Kshirsagar Mimicry: संदीप क्षीरसागरांनी पुन्हा केली धनंजय मुंडेंची नक्कल; म्हणाले, ‘कुणाचाही नाद करा; पण....’

अजित पवार यांच्या बंडानंतर मात्र हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील या दोन्ही आमदारांनी पवारांची साथ सोडली आहे. त्यामुळे पवार आता कोल्हापूरच्या मैदानात उतरणार आहेत. हसन मुश्रीफ पवारांना सोडून जातील, असे कोणालाही वाटत नव्हतं. मात्र, त्यांनीही पवारांची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात पवार मुश्रीफांना हल्लाबोल करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com