Assembly Session : अमृतांना ऑफर देणाऱ्या व्यक्तीने घेतलेल्या नेत्यांची नावे फडणवीसांनी विधानसभेत सांगणे का टाळले?

तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ajit Pawar-Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल करणाऱ्या मुलीच्या वडिलांशी एंगेजमेंट करताना अनेक धक्कादायक बाहेर आल्या. बोलता बोलता त्यांनी काही पोलिसवाल्यांची, काही नेत्यांची नावे घेतली. अनेक नेत्यांशी झालेले संभाषणही त्याने आम्हाला पाठवलं होतं. पण, ही नावे मी येथे सांगणार नाही. माझ्याबरोबरच माझ्या कुटुंबालाही ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सांगितले. (Devendra Fadnavis avoided taking those names in the assembly)

वडिलांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी अमृता फडणवीस यांना एक कोटींची ऑफर एका ड्रेस डिझाईनर मुलीने दिली होती. त्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फर्मेशन’द्वारे विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्याला फडणवीस उत्तर देत होते.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Amruta Fadnavis News : माझ्या वडिलांना जेलबाहेर काढा; तुम्हाला एक कोटी देते : अमृता फडणवीसांना ऑफर

त्या मुलीने आणि तिच्या वडिलांनी पाठविलेल्या व्हिडिओचे फॉरेन्सिकही करून घेतले आहे. त्यामध्ये पैसे भरतानाचा बॅग आणि माझ्या घरातील बाईला देतानाची बॅग वेगवेगळ्या आहेत, त्यात पैसेही नाहीत. पोलिसांनी सांगितले की, त्यांना आपण एंगेज करू. एंगेजमेंट करताना अनेक धक्कादायक बाबी बाहेर यायला लागल्या. त्यांनी बोलताना कबूल केलं की माझ्यावरील गुन्हे मागे घ्यायचे होते, त्यामुळे मी हे सर्व केलं. पण, मला आता मदत करा. त्याला वाटतं होतं की मी हे सर्व पोलिसांना सांगितलेलं नाही. आपण अमृता फडणवीस यांना धमकावत आहोत, हेही त्यांना माहिती झालं नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

फडणवीस म्हणाले की, बोलता बोलता त्यांनी काही पोलिसवाल्यांची, काही नेत्यांचीही नावं घेतली. मी कोणावर आरोप करत नाही. आम्ही तिला भेटायला बोलवलं. त्यावेळी तिने सांगितले की, मागच्या सीपीच्या काळात आमच्यावरील केसेस परत घेण्याची कार्यवाही सुरू झाली होती. तुम्ही आल्यावर ती थांबली. त्यावेळी तिने काही लोकांची नावंही घेतली. कसं आम्हाला हे करायला सांगितलं होतं आणि आता जर तुम्ही आमच्या केसेस परत घेतल्या तर आम्ही उलटं सांगू. यातील बहुतांश गोष्टी रेकॉर्डेड स्वरूपात आहेत. काही रेकॉर्डेड स्वरूपात नाहीत.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Supreme Court : ...म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाले; सिब्बलांचा मोठा दावा

ज्या ज्या वेळी ती बोलली, ते पोलिस डायरीत सर्व नोंद करण्यात आलेले आहे. ती व्यक्ती आमच्या ट्रॅपमध्ये येणार होती. पण एफआयर जास्त काळ लपून राहू शकत नाही. तो दाेन दिवसांत कोर्टात पाठवतो. त्यामुळे तो उघड झाला. ती मुलगी सापडेल की नाही मला माहिती नाही. तो माणूस गेली पाच-सहा वर्षे झाले पळालेला आहे. त्यामुळे तो सापडेल की नाही, माहिती नाही, अशी शंकाही फडणवीस यांनी उपस्थित केली.

अनेक प्रकारच्या हिंट तिने मला दिल्या. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण, काहीच सापडलं नाही. माझ्या कुटुंबाबरोबरही काहीतरी चाललंय आहे, ही कुणकूण मला लागली होती. काही लोकं सांगायचे की, तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासंदर्भात सर्व पुरावे हाती आले आहेत. ती व्यक्ती सापडला असता तर या पाठीमागे कोण आहे?, हे सर्व समजले असते. अनेक मोठ्या नेत्याशी त्यांचं झालंलं संभाषणही पाठविलं होतं. माझी सगळ्यांशी कशी ओळख आहे, हे दाखविण्यासाठी त्याने हे सर्व केले होते, असा दावाही फडणवीस यांनी केला.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
BJP News : मोदींच्या स्वागताला गुंडाची हजेरी : पंतप्रधान कार्यालयाने मागविला अहवाल; भाजपची कोंडी

उपमुख्यमंत्री म्हणाले की, त्या व्यक्तीवर कारवाई होईल. पण, राजकारणात आपण कुठल्या पातळीवर चाललो आहेत, याचाही विचार आपल्याला करावा लागेल. त्या मुलीने एका व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस यांना डॉलर दाखविले आहेत. ते आम्ही फडणवीस यांना देणार आहात, या अर्थाने. पण तिने अमृताला दिलेले नाहीत.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Border Conflict : सीमाप्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलं ; शिंदेंनी जाहीर केलेला निधी बोम्मई रोखणार ? ; काय आहे प्रकरण ?

ती मुलगा दीड वर्षे माझ्या घरी यायची. येताना भाऊ किंवा कुणालाही तरी घेऊन यायची. जे जे काही चाललं आहे, ते सर्व शूट करायची. त्यात आक्षेपार्ह गोष्टी आढळली नाही, त्यामुळे शेवटी त्यांनी असा ट्रॅप तयार करण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये तेही अतिशय स्पष्ट झाले आहे. यामागे राजकीय हेतू आहे की नाही, हे आज मी सांगू शकत नाही. कारण, जी व्यक्ती सांगते की त्यांनी सांगितलं आणि आता म्हणते की तुम्ही सांगितलं तर तुमच्या बाजूनो बोलतो. त्यामुळे अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com