Balasaheb Thorat News : भाच्याची बंडखोरी, मेव्हण्याचे निलंबन तरी थोरातांची चुप्पीच

Balasaheb Thorat News : नाशिक पदवीधर मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत.
Dr. Sudhir Tambe, Satyajit Tambe, Balasaheb Thorat
Dr. Sudhir Tambe, Satyajit Tambe, Balasaheb ThoratSakarnama

Balasaheb Thorat News : नाशिक पदवीधर मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत. काँग्रेसने (Congress) उमेदवारी जाहीर केलेले असताना सुद्धा डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर त्याचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात यांची चुप्पीच आहे.

सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे आहेत. तरीही या प्रकरणावर थोरात यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहे थोरात यांना काहीतरी वेगळे घडत आहे. तुम्ही लक्ष द्या, असे सांगितले होते, असे पवार यांनीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच भाजप (BJP) नेते व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही थोरात यांच्यावर निशाणा साधला.

Dr. Sudhir Tambe, Satyajit Tambe, Balasaheb Thorat
Satyajit Tambe News : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अन् भाजपही विरोधात गेली तरी सत्यजीत तांबेंच बाजी मारणार?

सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरला त्याला थोरात यांची समंती आहे का? असा सवाल त्यांनी केला. त्यावरही थोरात यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तर आपली भूमिकाही स्पष्ट केली नाही. त्यामुळे नाशिकमध्ये नेमके काय होणार असा प्रश्नच आहे. यामुळे थोरात यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

तसेच काँग्रेसच्या उमेदवारीवरून जो काही प्रकार घडला तो योग्य नव्हता. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जर तांबेंना कोरे एबी फॉर्म दिले होते, तर किमान दोघांपैकी एकाने तरी अर्ज भरायला हवा होता. मात्र, या विषयावर मी अधिक बोलू शकणार नाही. बाळासाहेब थोरातांना या संदर्भात अधिक माहिती असू शकेल, त्यांच्या घरातलाच हा विषय असल्याचे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Dr. Sudhir Tambe, Satyajit Tambe, Balasaheb Thorat
Old Pension Scheme News : राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? फडणवीसांचे सूचक वक्तव्य

तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मला काहीच माहिती नव्हती असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर बाळासाहेब थोरात काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर भाच्याची बंडखोरी आणि काँग्रेस पक्षाने मेव्हुण्यावर निलंबणाची कारवाई केली तरी थोरातांची चूप्पीच आहे, यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com