`यिन`चे मंत्री करणार मागण्यांचा राज्‍याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा!

समाजकारण, राजकारण, सहकार, कृषी, आरोग्‍य, प्रशासन अशी सर्वांगीण विषयांवर ‘सकाळ’ माध्यम समूहाच्‍या ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ च्या (यिन) तीन दिवसीय अधिवेशनात विचारमंथन झाले. ‘यिन’च्या शॅडो कॅबिनेटने मंजूर केलेल्या २६ ठरावांपैकी सहा महत्त्वाच्‍या मुद्यांवरील सखोल संशोधन सभागृहात सादर केले.
YIN 5
YIN 5

नाशिक : समाजकारण, (Socila work) राजकारण, (Politics) सहकार, (Cooperative) कृषी, (Agreeculture) आरोग्‍य, (health) प्रशासन (adminstration) अशी सर्वांगीण विषयांवर ‘सकाळ’ माध्यम समूहाच्‍या ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ च्या (यिन) तीन दिवसीय अधिवेशनात विचारमंथन झाले. (ideation on various issues in YIN convention) ‘यिन’च्या शॅडो कॅबिनेटने मंजूर केलेल्या २६ ठरावांपैकी सहा महत्त्वाच्‍या मुद्यांवरील सखोल संशोधन सभागृहात सादर करताना (6 out of 26 resolution present) खऱ्या अर्थाने अधिवेशनाचे फलित झाले. पुढील आठवड्यात हा सविस्‍तर अहवाल राज्य सरकारमधील संबंधित विभागाच्या मंत्र्यांना ‘यिन’च्या शॅडो कॅबिनेटमधील मंत्री सादर करत मागण्यांचा पाठपुरावा करणार आहे.

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या ‘यश-इन’ सभागृहात ‘यिन’ अधिवेशनाचा समारोप झाला. ‘यिन’ शॅडो कॅबिनेटच्‍या मंत्रिमंडळाचे २६ ठराव सभागृहात मंजूर करण्यात आले. सहा विषयांमध्ये संशोधनावर आधारित उपाययोजना सुचविल्‍या आहेत. त्यात प्रामुख्याने बेरोजगारी व कौशल्‍यविकास, कृषी, युवती सक्षमीकरण, शैक्षणिक शुल्‍कमाफी या विभागांशी निगडित ठराव राज्य सरकारमधील त्‍या- त्‍या विभागाच्या मंत्र्यांना सादर केले जाणार आहेत. समारोप सत्रासाठी आमदार नीलेश लंके, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर उपस्थित होते.

‘यिन’ अधिवेशनातील सहा ठराव
बेरोजगारी व कौशल्‍य विकास : पाच वर्षांत पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी, दर वर्षी पदवी शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी, सध्या बेरोजगारीचे प्रमाण, किती युवकांना नोकऱ्यांची आवश्‍यकता आहे. नोकरीच्‍या संधी किती प्रमाणात निर्मितीची आवश्‍यकता आहे.

कौशल्‍य विकासाच्‍या संधी.
सध्याच्या परिस्‍थितीत शुल्‍कमाफी हवी : शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, कौटुंबिक परिस्‍थिती बेताची असलेले विद्यार्थी, दुष्काळ, अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्‍या कुटुंबातील विद्यार्थ्यांची माहिती. त्‍यांच्‍या शुल्‍कमाफीचा पाठपुरावा.

सेट नेट व पीएच.डी. परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची संख्या, किती वर्षांपासून कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांतील पदे भरलेली नाहीत, त्‍यामुळे किती परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी आत्‍महत्‍या केली. पात्र उमेदवारांना सरकारने नोकरीत सामावून घेत त्‍यांना न्‍याय देणे.

पोलिस भरतीत अनेक उमेदवारांची थोडक्‍यात संधी हुकते. अशा उमेदवारांची संख्या व त्‍यांच्‍यापुढील तांत्रिक अडचणी. अशा उमेदवारांना सरकारतर्फे स्‍वतंत्र विभाग स्‍थापन करत कायदा सुव्‍यवस्‍था क्षेत्रात नोकरीची संधी देणे.

युवतींचे सक्षमीकरण करण्यासाठी त्‍यांना समतेचा अवलंब केला पाहिजे. त्‍यासाठी मुलांप्रमाणे मुलींचेही लग्‍नाचे वय २१ करावे. तसेच युवतींना शाळा, महाविद्यालयस्‍तरावर स्‍वयंसुरक्षेचे प्रशिक्षण सक्‍तीचे करावे.

शेतकरी कर्जबाजारी होण्यामागे हुंड्याचे प्रमुख कारण आहे. अशा परिस्‍थितीत गावपातळीवर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना हुंडा प्रथेला आळा घालावा. शेतकऱ्यांना साक्षर करण्याबाबत व्‍यापक उपाययोजना कराव्यात.

‘यिन’चे मंत्री दौरा करणार
‘यिन’च्या अधिवेशनानंतर येत्या १५ ऑगस्‍टपासून ‘यिन’ शॅडो कॅबिनेटचे मुख्यमंत्री अजय खांडबहाले, उपमुख्यमंत्री विशाल पाटील राज्‍याचा दौरा करणार आहेत. नागपूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्‍हापूर, सातारा, पुणे, मुंबई आदी ठिकाणी ते जातील. दौऱ्यात ‘यिन’ शॅडो कॅबिनेट मंत्री सामाजिक संस्‍थांना भेट देतील. ‘सकाळ’च्‍या संपादक, जिल्‍हा प्रतिनिधींसोबत बैठक घेतील. सोबत स्‍थानिक महाविद्यालयांची भेट घेत प्राचार्य आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com