सरकार मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे
Sambhajiraje

सरकार मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय चिंतन बैठक नवी मुंबईत झाली. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील समन्वयकांनी या चिंतन बैठकीला हजेरी लावली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेवर नाखूष असल्याचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.

नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय चिंतन बैठक नवी मुंबईत झाली. (Maratha kjanti morcha meeting held at Navi Mumbai)  खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhajiraje) यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील समन्वयकांनी या चिंतन बैठकीला हजेरी लावली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेवर नाखूष असल्याचे (They are unhappy with the role of Government) खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. 

बैठकीनंतर ते म्हणाले, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही सर्व थोडे खुष होती की, आम्ही सक्रीय झाल्यानंतर सरकार थोडे सक्रीय दिसत होते. मात्र दोन महिन्यात राज्य सरकारने सारथी संस्थेची काही प्रामणात स्वायतत्ता आणि कोल्हापूरचे उपकेंद्र सोडून काहीही केलेले दिसत नाही. उर्वरीत चार मागण्यांसाठी त्यांनी फारसे काही केलेले दिसत नाही. त्या पुढे नेलेल्या नाहीत. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसी शिक्षणाच्या सवलती असतील, दोन हजर 185 जागांवरील नोकरीच्या नियुक्ती असतील, विद्यार्थ्यांचा तो प्रश्न आजही प्रलंबित आहे. त्यांनी जो जीआर काढला तो आम्हाला मान्य नाही. अनेक चांगल्या गोष्टी पुढे दिसत असल्या तरी तेव्हढ्याच वाईट गोष्टीही आहेत. त्यापेक्षा सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या पदावर निवड केली आहे तेथे त्यांना नियुक्त्या कराव्यात अशी आमची मागणी आहे. या सर्व प्रश्नांसह विविध विषयांवर 9 ऑगष्टला चर्चा होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील  दिशा  ठरेल. 

सकल मराठा समाजाची बैठक छत्रपती, खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी 18 ते 20 जिल्ह्यांतील समन्वयक यावेळी उपस्थित होते. शेवटचे मूक आंदोलन नाशिकला झाले. सरकारने त्यावेळी सकारात्मक दृष्टीकोण दाखवला. त्यामुळे आम्ही आंदोलनाला तत्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर आज दिड ते दोन महिने झाले आहेत. आजची जी बैठक झाली ती सबंध आठवडाभर आधीच होणार होती. मात्र  पश्चिम महाराष्ट्र, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर आदी भागात महापूर आला. त्यामुळे परिस्थिती भयानक परिस्थिती निर्माण झाली. रायगड, तळीन सारख्या ठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यामुळे आम्ही कुठेही गडबड केली नाही. कारण ते विषय आरक्षणापेक्षाही या क्षणाला जास्त महत्त्वाचे आहेत.

आरक्षणाचे विषय दहा पंधरा दिवसांनी देखील घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आजच्या बैठकीत हाच सूर होता, की जी बैठक मुख्यमंत्री व अकरा, बारा मंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. त्यातून मराठा समाजाला त्यांनी काय दिले?. सारथीला काही प्रमाणात स्वायतत्ता वगळता फारसे काही झालेले नाही. त्यापेढा कोणतिही गोष्ट पुढे गेलेली नाही. त्यामुळे सरकार हे दिशाभूल करायला लागले आहे. हे असे जर होणरा असेल तर आम्ही खपवून घेणार नाही.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in