नंदुरबारच्या नव्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री ; डॅा. भारुड यांची 'आदिवासी विकास'च्या आयुक्तपदी बदली - Manisha Khatri new Collector Nandurbar Dr. Bharud transferred Commissioner of Tribal Development | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

नंदुरबारच्या नव्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री ; डॅा. भारुड यांची 'आदिवासी विकास'च्या आयुक्तपदी बदली

दिनू गावित
शनिवार, 10 जुलै 2021

नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून मनिषा खत्री या पदभार  सांभाळणार आहे.

नंदुरबार :  नंदुरबार कलेक्टर म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ. राजेंद्र भारूड  Rajendra Bharud यांची पुणे येथे आदिवासी विकास विभागातील प्रशिक्षण व संशोधन संस्थेत आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून मनिषा खत्री Manisha Khatri या पदभार  सांभाळणार आहे. Manisha Khatri new Collector Nandurbar Dr. Bharud Commissioner of Tribal Development

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे येथील मुळगावचे डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात पाचवी ते दहावी शिक्षण घेऊन पुढे डॉक्टर व आयएस झालेले आदिवासी कलेक्टर नंदुरबार आदिवासी जिल्ह्याला लाभले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. विशेष म्हणजे कोरोना काळात प्रत्येक तालुक्यात कोवीड केअर सेंटर उभारुन ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करून रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल नंदुरबार पॅटर्नची देशभरात चर्चा झाली. डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या कार्याचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले होते.

आदिवासी जिल्ह्याला लाभलेले एक आदिवासी कलेक्टर संयमी, शिस्तबद्ध, अभ्यासू व कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख राहिली. डॉक्टर राजेंद्र भारूड आणखी काही काळ जिल्हाधिकारी म्हणून राहिले पाहिजे होती अशी सर्वसामान्य नागरिकांकडून इच्छा व्यक्त केली जात आहे. 

साडेसात लाखाची लाच घेताना दोघां पोलिस अधिकाऱ्यांना अटक
सोलापूर :  मुरूम चोरीच्या गुन्ह्यात एका आरोपीला मदत करतो, असे सांगून आरोपीकडून साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकासह सहाय्यक पोलिस निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आलं आहेत. पोलिस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे असे दोघा लाचखोर पोलिस अधिकार्‍यांची नावे आहेत. या दोघांना ही काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पुना नाका परिसरात जेरबंद केलं आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख