साडेसात लाखाची लाच घेताना दोन पोलिस अधिकारी जेरबंद

संपत पवार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांनी 10 लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती.
Sarkarnama Banner - 2021-07-10T083754.345.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-10T083754.345.jpg

सोलापूर :  मुरूम चोरीच्या गुन्ह्यात एका आरोपीला मदत करतो, असे सांगून आरोपीकडून साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकासह सहाय्यक पोलिस निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आलं आहेत. Two police officers arrested for accepting bribe of Rs 7.5 lakh


पोलिस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे असे दोघा लाचखोर पोलिस अधिकार्‍यांची नावे आहेत. या दोघांना ही काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पुना नाका परिसरात जेरबंद केलं आहे. याबाबत एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करून गुन्ह्यातून सही सलामत सुटण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलिस निरीक्षक संपत पवार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांनी 10 लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती साडेसात लाख रूपये देण्याचे ठरले. त्यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 

त्यानंतर तक्रारीची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला असता सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे याला पैसे स्वीकारत असताना रंगेहात पकडले त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सलगरवस्ती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत पवार यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी लाचेची रक्कम स्विकारली असल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी पोलिस निरीक्षक संपत पवार यांना शासकीय विश्रामगृहातून ताब्यात घेतले आणि त्या दोघांविरूध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संपत पवार हे सलगरवस्ती पोलिस ठाण्यात रूजू झाल्यापासून वादग्रस्त ठरलेले होते. स्थानिक आमदारांशी भररस्त्यात वाद घालून त्यांनी  तमाशा केला होता. लॉकडाऊनमध्ये अनेक नागरीक तसेच व्यापार्‍यांना त्यांनी त्रास दिला होता.

चारनंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी वसुलीचे नवे रेट कार्ड ; मनसेचा टोला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. देशपांडे यांनी एक व्हिडिओ टि्वट करीत ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com