विठ्ठल मंदिर समिती अध्यक्षपदासाठी शिंदे, थोपटे, पाटील यांची नावे आघाडीवर 

तशी काँग्रेस आमदारांमध्ये चाचपणी देखील सुरु झाली आहे.
Praniti Shinde, Sangram Thopte, Kunal Patil are in the lead for the post of Chairman of Vitthal Mandir Samiti
Praniti Shinde, Sangram Thopte, Kunal Patil are in the lead for the post of Chairman of Vitthal Mandir Samiti

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार अधिक स्थिर करण्यासाठी प्रमुख महामंडळे आणि देवस्थान समित्यांचे वाटप जवळपास निश्चित झाले आहे. देवस्थान समित्यांच्या वाटपात काँग्रेसला शिर्डीच्या बदल्यात पंढरपूर देण्यात आले आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी, यासाठी काँग्रेस आमदारांमध्ये लॉबिंग सुरु झाले आहे. यामध्ये आमदार प्रणिती शिंदे (सोलापूर), आमदार संग्राम थोपटे (भोर, जि. पुणे), आमदार कुणाल पाटील (धुळे) या काँग्रेस आमदारांची नावे आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (Praniti Shinde, Sangram Thopte, Kunal Patil are in the lead for the post of Chairman of Vitthal Mandir Samiti)

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर अध्यक्षपदाची संधी मिळावी, यासाठी अनेक महाराज मंडळींचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे काँग्रेसने पक्षातीलच एखाद्या आमदाराला समितीवर अध्यक्षपदाची संधी देण्याचे  संकेत दिले आहेत. मंदिर समितीच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या आमदाराचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने काँग्रेस नेत्यांनी विचार सुरु केला आहे. तशी काँग्रेस आमदारांमध्ये चाचपणी देखील सुरु झाली आहे.

भाजप सरकारच्या काळातदेखील असाच प्रयोग करुन कराडचे भाजप नेते अतुल भोसले यांना अध्यक्षपदाची संधी देवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीने अण्णासाहेब डांगे यांना मंदिर समितीवर अध्यक्षपदाची संधी देऊन धनगर समाजाला जवळ केले होते. असाच प्रयोग काँग्रेस नेते करण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींचे काँग्रेस नेत्यांशी फारसे संबंध नसल्याने एखाद्या वजनदार आमदाराला अध्यक्षपद देवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील या निमित्ताने केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी हुकलेल्या काँग्रेस आमदाराला विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. यामध्ये सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या बरोबरच धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांचे ही नाव सध्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. यापैकी अध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार की अन्य  कोणाची वर्णी लागणार, याकडेच वारकरी संप्रदायासह काँग्रेस आमदारांचे लक्ष लागले आहे.
 
आषाढीपूर्वी नवी समिती

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी देवसंस्थान काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. अध्यक्षपदासह इतर सदस्यांच्या निवडीसाठी काँग्रेस नेत्यांनी आमदार आणि कार्यकर्त्यांची नावे मागवली आहेत. येत्या 20 जुलै रोजी होणाऱ्या आषाढीवारीपूर्वी नवीन मंदिर समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. तसे विधी व न्याय विभागाला आदेश देण्यात आल्याचेही समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com