आता सांगली झेडपीतही जयंतरावांची चाल : भाजपला दिला पहिला धक्का

त्यांच्या प्रयत्नांतूनच नवले यांचा राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षातप्रवेश झाला आहे.
Sangli ZP's BJP member Nitin Navale joins NCP
Sangli ZP's BJP member Nitin Navale joins NCP

सांगली : सांगली महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही भारतीय जनता पक्षाला धक्का देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाल्याचे मानले जात आहे. कारण, भाजपची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा परिषदेस खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांची आज (ता. २३ जून) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (Sangli ZP's BJP member Nitin Navale joins NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील अंकलखोप गटातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनी मुंबईतील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नितीन नवले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी पुणे पदवीधर मतदारसंघाचे पक्षाचे आमदार अरुण लाड आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांतूनच नवले यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

सांगली महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची बहुमतातील सत्ता महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालकमंत्री जयंत पाटील यांनी उलथवून टाकली आहे. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या सहा सदस्यांनी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत मदत केली होती. त्यातील चार नगरसेवकांनी थेट कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले हेाते, तर दोघे मतदानच्या वेळी गैरहजर राहिले होते. त्यामुळे भाजपची सांगली महापालिकेतील सत्ता संपुष्टात येवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर, तर कॉंग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर झाले आहेत.  

महापालिकेतील या सत्तांतरामागे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उघड गुपीत हेाते. त्यांच्या करेक्ट कार्यक्रमामुळे घायाळ झालेला भाजप पालिकेची सत्ता गेल्याच्या धक्क्यातून अजून सावरलेला नाही. तोच जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला हादरे बसायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे त्याचीही सुरुवात जयंत पाटील यांच्या माध्यमातून झाली आहे. जयंत पाटील यांच्या या डावपेचाला भारतीय जनता पक्ष कसे रोखणार हे पाहणे सध्या औत्सुक्याचे ठरणार आहे. 

सांगली महापालिकेतील असंतुष्टाप्रमाणेच जिल्हा परिषदेतही भाजप सर्व काही आलबेल आहे, असे दिसून येत नाही. विविध प्रश्नावरून सत्ताधारी भाजपतील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीपर्यंत तरी जिल्हा परिषद सदस्य सांभाळून ठेवण्याचे अवघड गणित भारतीय जनता पक्षाला जुळवावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com