...तर मोहिते पाटील लढणार माढ्यातून विधानसभेची निवडणूक

कारण, माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील नदीकाठची चौदा गावे ही माढा विधानसभा मतदारसंघात जोडलेली आहेत.
Malshiras Panchayat Samiti upsabhapati will be elected on 17th May :
Malshiras Panchayat Samiti upsabhapati will be elected on 17th May :

नातेपुते  (जि. सोलापूर) : माळशिरस (Malshiras) पंचायत समितीचे उपसभापतीपद (upsabhapati) सध्या रिक्त आहे. या पदावर यापूर्वी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील धनगर समाजातील युवक नेते किशोर सुळ (Kishor Sul) आणि त्यांच्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी काम केले. येत्या 17 मे रोजी उपसभापती पदाची निवड आहे. सध्या मोहिते पाटील (Mohite Patil) गटाकडे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ सदस्य 14 असून या 14 पैकी कोणाची वर्णी लागणार यावर विधानसभेचे आडाखे बांधले जात आहेत. (Malshiras Panchayat Samiti upsabhapati will be elected on 17th May)

उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीने लढविली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामधून विजय झालेले सात आणि शिवसेनेमधून विजयी झालेले एक असे एकूण आठ पंचायत समिती सदस्य आहेत. याउलट सध्या मोहिते पाटील गट सध्या भाजपचे काम करीत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झालेले 14 पंचायत समिती सदस्य काम करीत आहेत. अशी राजकीय परिस्थिती माळशिरस तालुक्यात आहे. 

मोहिते पाटील गटाकडून उपसभापतीपदासाठी बोरगावचे युवक कार्यकर्ते, पंचायत समिती सदस्य प्रताप पाटील हे प्रचंड इच्छुक आहेत. त्यांना उपसभापती पदाची लॉटरी लागली तर भविष्यात मोहिते-पाटील यांना माढा विधानसभा निवडणूक लढवायची आहे, असे गृहितक मांडले जात आहेत. कारण, माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील नदीकाठची चौदा गावे ही माढा विधानसभा मतदारसंघात जोडलेली आहेत. माळशिरस विधानसभा मतदार संघात एकहाती सत्ता मिळवायची असेल, तर तालुक्यातील पश्चिम भागातील सदस्याला विशेषतः धनगर समाजातील सदस्याला उपसभापती पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. 

विद्यमान आमदार राम सातपुते हे अटीतटीच्या लढतीत काठावर पास झालेले आहेत. पश्चिम भागात धनगर किंवा माळी समाजाला उपसभापती दिले, तरच माळशिरस विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीत हे समाज काही प्रमाणात मोहिते-पाटील गटाकडे वळू शकतात. येत्या 17 तारखेला उपसभापती कोण होते. त्यावरच विधानसभेचे आडाखे बांधले जात आहेत.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते बाळदादा आणि भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील या चौघांच्या  विचारविनिमयातून उपसभापती पदी कोणाला संधी द्यायचे, हे निश्चित होणार आहे. त्यामुळे ठामपणे कोणीही या पदावर दावा सांगू शकत नाही. माळशिरस तालुक्यात राजकीय पक्षापेक्षा गटातटाचे, जातीचे राजकारण प्रबळ होत चाललेले आहे.

विद्यमान आमदार राम सातपुते यांचा पंचायत समितीमध्ये फारसा प्रभाव किंवा त्याचा हक्काचा सदस्य नाही. उत्तमराव जानकर हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असले तरी पंचायत समितीमध्ये त्यांना मानणारे भाजप आणि शिवसेनेचे आठ सदस्य कार्यरत आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील कुणाला संधी देणार यावर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com