समाधान आवताडेंना आशिष शेलारांनी लावला आमदारकीचा बिल्ला

आवताडे यांनी पंढरीचा पांडुरंग आणि मंगळवेढ्याचे श्री संत दामाजीपंतांना स्मरून समाजसेवेची शपथ घेतली.
Newly elected MLA Samadhan Avtade was sworn in as an Assembly member
Newly elected MLA Samadhan Avtade was sworn in as an Assembly member

पुणे  ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Avtade) यांनी आज (ता. १२ मे) विधानसभा सदस्यत्वाची शपथ (Oath of Assembly membership) घेतली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या दालनात आमदार आवताडे यांनी पंढरीचा पांडुरंग आणि मंगळवेढ्याचे श्री संत दामाजीपंतांना स्मरून समाजसेवेची शपथ घेतली. त्या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी प्रथम आवताडे यांना आमदारकीचा बिल्ला लावला. (Newly elected MLA Samadhan Avtade was sworn in as an Assembly member.)

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत अटीतटीच्या लढतीत समाधान आवताडे यांनी भगिरथ भालके यांच्यावर 3733 मतांनी विजय मिळवला आहे. या विजयासाठी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावरच आवताडे हे आमदार होऊ शकले. कारण, मागच्या दोन्ही निवडणुकीत परिचारक आणि आवताडे यांनी परस्परविरोधात लढल्याने दोघांचाही पराभव झाला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीत आमदार परिचारक यांनी माघार घेत आवताडे यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती.

दरम्यान, आपण माझ्यावर विश्वास दाखवून मला मतरुपी आशीर्वाद दिला. म्हणूनच आज मी ईश्वराला साक्षी ठेवून आणि पांडुरंग तसेच श्री संत दामाजींना स्मरून आपली सेवा करण्याची आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा विकास साधण्याची शपथ घेतली आहे. ही केवळ शपथ नाही, तर हा जनसेवेचा वसा आहे. ही सेवा करताना मला पदोपदी आपले पाठबळ आणि आशीर्वाद लागणार आहेत, ते असेच अबाधित राहावेत, असे त्यांनी शपथ घेतल्यानंतर म्हटले आहे.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर माजी मंत्री तथा आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्या आमदार दालनात माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा बॅच लावला. या वेळी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बाळा भेगडे, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री शशिकांत चव्हाण, छोटे बंधू उद्योजक संजय आवताडे, अरुण बारबोले व भाजपचे पदाधिकारी  उपस्थित होते.

आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आवताडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. शिवप्रभूंनी दाखवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या वाटेवर आपला पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

दरम्यान, त्यानंतर आमदार आवताडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छाभेट घेतली. त्या वेळी त्यांनी आमदार आवताडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com