अवघ्या चार दिवसांत कोरोनाने घेतला पिता-पुत्राचा बळी

तालुक्याच्या राजकारणात त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याबरोबर काम केले होते.
Former director of Adinath factory Nanasaheb Surve and his son died due to corona
Former director of Adinath factory Nanasaheb Surve and his son died due to corona

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब सुर्वे (वय 55, रा. कुंभेज, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचे २५ मे रोजी कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत त्यांचे पुत्र तात्यासाहेब सुर्वे (वय ३०) यांचाही शनिवारी (ता. २९ मे) कोरोनाने बळी घेतला. अवघ्या चार दिवसांतच घरातील दोन कर्ते पुरुष कोरोनामुळे दगावल्याने सुर्वे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोघांवर वसई येथे उपचार सुरू होते. (Former director of Adinath factory Nanasaheb Surve and his son died due to corona)

कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर नानासाहेब सुर्वे आणि तात्यासाहेब सुर्वे यांना त्यांच्या नातेवाइकांनी वसई येथे उपचारासाठी नेले होते. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत गेली. वसईच्या रुग्णालयात उपचार सुरू असतानाच २५ मे रोजी नानासाहेब यांचा मृत्यू झाला, तर त्यानंतर अवघ्या चार दिवसांत २९ मे रोजी तात्यासाहेब यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तात्यासाहेब यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. बापलेकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नानासाहेब सुर्वे हे करमाळा तालुक्यातील प्रतिष्ठीत राजकारणी होते. त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते. तालुक्याच्या राजकारणात त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याबरोबर काम केले होते. सध्या ते माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे काम करत होते.

नानासाहेब सुर्वे यांच्या पश्चात पत्नी, दोन बंधू, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यातील एका मुलाचे शनिवारी (ता. २९ मे) निधन झाले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 2001 मधील निवडणुकीत ते जगताप गटाकडून निवडून आले होते. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीबरोबरच नानासाहेब यांनी पंचायत समितीची निवडणूकही लढवली होती.  कुंभेज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com